सूरजने जेवण सांडल्याने अंकिताने त्याला टोकलं, निक्की भडकून म्हणाली- "त्याच्यावर अत्याचार करु नका..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 15:17 IST2024-09-29T15:16:58+5:302024-09-29T15:17:27+5:30
सूरजचं जेवण झाल्यानंतर अंकिताने त्याला सुनावल्यानंतर निक्की तिच्यावर चांगलीच भडकलेली दिसली (suraj chavan)

सूरजने जेवण सांडल्याने अंकिताने त्याला टोकलं, निक्की भडकून म्हणाली- "त्याच्यावर अत्याचार करु नका..."
बिग बॉस मराठीचा नवीन सीझन संपायला फक्त १ आठवडा बाकी आहे. पुढील सात ते आठ दिवसात बिग बॉस मराठीचा नवीन सीझन संपेल. हा सीझन चांगला सुरु असूनही लवकर संपत असल्याने प्रेक्षकांना चुटपुट लागून राहिली आहे. अशातच बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा आजचा प्रोमो रिलीज झालाय. यावेळी सूरजने जेवण थोडंसं सांडवल्याने अंकिता त्याच्यावर चांगलीच रागावलेली दिसते. त्यामुळे सूरज तिच्यावर भडकलेला दिसला.
सूरजवर अंकिता भडकली, तर निक्की रागावली
बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत जेवण जेवल्यानंतर सूरजने ते थोडं सांडवलं. त्यामुळे तो फडका मारून पुसत होता. त्यामुळे अंकिता त्याच्यावर रागावलेली दिसली. निक्की अंकिताला म्हणाली, "जाऊदे ना किती त्याला टोकायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला टोमणा मारायचा" त्यामुळे अंकिता सूरजला म्हणते, "तिचं ऐक तू." पुढे निक्की म्हणताना दिसते, "तुम्ही त्याला घर देताय म्हणून अत्याचार करु नका."
पुढे अभिजीत आणि पॅडी बाथरुममध्ये असतात. अभिजीत निक्कीची बाजू घेत पॅडीला म्हणतो की, "सारखं सारखं सूरजला टोमणे नाही ऐकवत." पॅडी अभिजीतला म्हणतो, "तू निक्कीच्या मताशी सहमत आहेस?" पुढे निक्की पॅडी, अंकिताला उद्देशून म्हणते की, "तुमचं खरं बाहेर आलं की तुम्हाला टोचतं ते." अशाप्रकारे निक्की-अंकिता-पॅडीमध्ये वादाची ठिणगी पडलेली दिसली. सूरजही टेबलवर हात ठेऊन शांत दिसला. आता या भांडणात कोण चूक? कोण बरोबर? हे आजच्या भागात कळेलच.