कुठे सुरू आहे अंकिता वालावलकरचं प्री-वेडिंग शूट, शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 16:56 IST2025-01-17T16:56:06+5:302025-01-17T16:56:22+5:30

प्री वेडिंग फोटोशूट हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून ट्रेंडमध्ये आहे.

Ankita Walawalkar Aka Kokan Hearted Girl Started Prewedding Photoshoot At Devbaug Beach With Fiance Kunal Bhagat | कुठे सुरू आहे अंकिता वालावलकरचं प्री-वेडिंग शूट, शेअर केला व्हिडीओ

कुठे सुरू आहे अंकिता वालावलकरचं प्री-वेडिंग शूट, शेअर केला व्हिडीओ

'कोकण हार्टेड गर्ल' अशी ओळख असणारी 'बिग बॉस' फेम अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar Aka Kokan Hearted Girl ) चांगलीच चर्चेत असते. अंकिता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.  येत्या फेब्रुवारी महिन्यात ती कुणाल बरोबर लग्नगाठ बांधणार आहे. काहीच दिवसांपूर्वी अंकिताने तिची लग्नपत्रिका शेअर केली होती. तेव्हापासून चाहत्यांना तिच्या लग्नाची आतुरता लागली आहे. लग्न म्हटलं की प्री वेडींग फोटोशूट (Pre Wedding Photoshoo)आलं. मग यात अंकिता कुठे मागे राहिलं. 

प्री वेडिंग फोटोशूट हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये लग्नाच्या काही दिवस आधी वेगवेगळ्या थीम ठरवून शूट केले जाते. आता अंकिता देखील प्री-वेडिंग फोटोशूट करत आहेत. अंकितानं प्री वेडिंग फोटोशूटसाठी कोकणातील देवबाग हे ठिकाण निवडलं आहे.  "प्री वेडिंगला एवढ्या प्रिसकाळी कोण उठवत?", असं कॅप्शन देत अंकिताने एक स्टोरी पोस्ट केली आहे. तर ही स्टोरी रिपोस्ट करत कुणालने "मी" असं उत्तर दिलं आहे. यानंतर अंकिताने देवबाग समुद्र किनाऱ्याचा व्हिडीओ शेअर केलाय. 

दरम्यान, अंकिताने काही दिवसांपूर्वीच तिच्या लग्नपत्रिकेची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. या जोडप्याच्या लग्नपत्रिकेला केळीच्या पानाची डिझाइन करण्यात आली आहे. अंकिताने परंपरेनुसार सर्वप्रथम गावच्या मंदिरात आपल्या लग्नाची पत्रिका ठेवली होती. अंकिता वालावलकरचा होणारा नवराही एक कलाकार आहे. तो इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. त्याचं नाव कुणाल भगत आहे. कुणाल हा एख संगीत दिग्दर्शक आहे. त्याने अनेक गाणी, चित्रपट आणि टीव्ही मालिकांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.  आता चाहते हे अंकिता लग्नबंधनात केव्हा अडकणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Ankita Walawalkar Aka Kokan Hearted Girl Started Prewedding Photoshoot At Devbaug Beach With Fiance Kunal Bhagat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.