एकता कपूरची मालिका 'पवित्र रिश्ता', मात्र अंकिता लोखंडेला मिळायचे केवळ काही हजार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 18:40 IST2024-03-22T18:40:10+5:302024-03-22T18:40:54+5:30
अंकिता लोखंडेचं मानधन किती होतं माहितीये का?

एकता कपूरची मालिका 'पवित्र रिश्ता', मात्र अंकिता लोखंडेला मिळायचे केवळ काही हजार?
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचली. सुशांतसिंह राजपूत आणि अंकिताची जोडी सुपरहिट झाली होती. या मालिकेने अंकिताला रातोरात टीव्ही स्टार केलं होतं. मराठी टच असल्याने मराठी प्रेक्षकही मालिकेला भरभरुन प्रतिसाद देत होते. तसंच अंकिताही तशी या क्षेत्रात नवीन होती. १२ १२ तासांची शिफ्ट करतही तिने काम केलं आहे. पण इतकी मेहनत करुनही अंकिताला किती मानधन मिळायचं माहितीये का?
कलाकार म्हणलं आणि तेही लोकप्रिय मालिकेतील कलाकार तर त्यांचं मानधन ऐकून आपले डोळे पांढरे होतात. एका एपिसोडचे कितीतरी लाख हे लोक घेत असतात. पण 'पवित्र रिश्ता' ही अख्खी मालिका जिच्यामुळे चालली त्या अंकिता लोखंडेला सुरुवातीला अगदीच कमी मानधन मिळत होतं. अंकिता काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाली, 'मला तेव्हा महिन्याला 50 हजार रुपये मिळायचे. पण मला तेही खूप वाटायचे कारण मी पहिल्यांदाच इतकं कमवत होते." आज अंकिता कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. पण तिनेही जो स्ट्रगल पाहिला तो कमी नाहीए.
मालिकेतील लग्नाच्या सीक्वेन्ससाठी तर तिने १४८ तास काम केल्याचं ती म्हणाली होती. ती सेटवर झोपायची, तिथेच आवरुन शॉटसाठी तयार व्हायची. पण ती मेहनत तिला आवडत होती कारण तिला ते काम आवडत होतं. पवित्र रिश्ता बरीच वर्ष चालली. सुशांत मात्र मध्येच बाहेर पडला आणि बॉलिवूडकडे वळला. नंतर अंकिता सुशांतच्या नात्यात अनेक वळणं आली आणि अखेर त्यांच्या नात्याचा शेवटही झाला.