विकीसोबत लग्न केल्याचा अकिंताला पश्चाताप ? बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये झाली तू-तू मैं-मैं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 15:12 IST2024-01-08T15:09:40+5:302024-01-08T15:12:12+5:30

अंकिता आणि विकीचं पुन्हा बिनसल्याचं दिसून येत आहे. 

Ankita Lokhande and Vicky Jain are facing challenges in their relationship within the Bigg Boss 17 | विकीसोबत लग्न केल्याचा अकिंताला पश्चाताप ? बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये झाली तू-तू मैं-मैं

विकीसोबत लग्न केल्याचा अकिंताला पश्चाताप ? बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये झाली तू-तू मैं-मैं


'बिग बॉसच्या १७' व्या सीझनमध्ये मोठे ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता लोखंडे ही पती विकी जैनसोबत 'बिग बॉसच्या १७' च्या घरात आहे. 'बिग बॉस १७' मध्ये सामील होताच अगदी सुरुवातीपासून या जोडप्यांमध्ये कडाक्याचे भांडण दिसून आलं. ण दोघेही अनेकदा शोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात अंकिता आणि विकीचं पुन्हा बिनसल्याचं दिसून येत आहे. 

'बिग बॉसच्या १७' च्या प्रोमोमध्ये दिसत आहे की,  अंकिताला पती विकी आणि मन्नारा चोप्रा यांच्यातील मैत्री आवडत नाही. या कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याचे दिसून येते. प्रोमोच्या सुरुवातीला अंकिता विकीला म्हणते, आता आचानक मन्नारा आयुष्यात आली. तुला ती चांगली वाटते. तिच्याशी बोलताना तुल आनंद होतो.  त्यानंतर विकी म्हणतो की,"यात काय चूक आहे. ती माझी मैत्रिण आहे. याप्रकारे तु सर्व मित्रांना पळवून लावतेस".

यानंतर पुन्हा किचनमध्ये पुन्हा दोघांमध्ये वाद वाढतो.  अंकिता विकीला म्हणाली,"जा आणि कोणीतरी सुशिक्षित शोधं. मी सुद्धा विचार करून निर्णय घेतला असता तर कदाचित असे झाले नसते". तेव्हा विकी टोमणा मारत म्हणतो की, "तू विचारपूर्वक कोणता निर्णय घेतला आहेस?". विकीचे हे शब्द ऐकून अंकिता रडायला लागते आणि म्हणते, 'प्रेम संपलं असं वाटतं आहे'. यावर तर विकी म्हणतो, "माझं लग्न केलं आहे तुझ्याशी. मी गुलाम नाही". प्रोमोला कॅप्शन देण्यात आले, 'अंकिता आणि विकी यांच्यात पुन्हा भांडण झाले. हा वाद ते सोडवू शकतील का?'

येत्या फॅमिली विकमध्ये विकीची आई अर्थात अंकिताची सासू त्यांना भेटण्यासाठी बिग बॉसमध्ये येणार आहे. अशा परिस्थितीत, शोमध्ये आल्यानंतर विकीची आई अंकितासोबत कसे वागते हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तर याआधीही विकीची आई आणि अंकिताची आई या दोघी काही दिवसांपूर्वी बिग बॉसमध्ये आल्या होत्या. त्या दोघींनी विकी आणि अंकिता यांना भांडण न करण्याचा सल्ला दिला होता.

Web Title: Ankita Lokhande and Vicky Jain are facing challenges in their relationship within the Bigg Boss 17