​अंगुरी भाभी म्हणजेच शुभांगी अत्रेने व्यक्त केली ही इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 11:16 IST2018-01-09T05:46:10+5:302018-01-09T11:16:10+5:30

भाभीजी घर पर है ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. या मालिकेतील अंगुरी भाभी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या ...

Anguri Bhabhi means Shubhangi Atre expressed desire | ​अंगुरी भाभी म्हणजेच शुभांगी अत्रेने व्यक्त केली ही इच्छा

​अंगुरी भाभी म्हणजेच शुभांगी अत्रेने व्यक्त केली ही इच्छा

भीजी घर पर है ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. या मालिकेतील अंगुरी भाभी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत ही व्यक्तिरेखा शिल्पा शिंदे साकारत होती. पण या मालिकेचे निर्माते आणि शिल्पा यांच्यात झालेल्या वादामुळे शिल्पा या मालिकेतून बाहेर पडली. सध्या या मालिकेत अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांना शुभांगी अत्रेला पाहायला मिळत आहे. शुभांगीची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. प्रेक्षकांनी तिला या भूमिकेत स्वीकारले असल्याने ती चांगलीच खूश आहे. सध्या प्रेक्षकांची ओरिजनल अंगुरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदे बिग बॉसच्या घरात आहे. ती या कार्यक्रमाची विजेता ठरेल असे म्हटले जात आहे.
बिग बॉस या कार्यक्रमात शिल्पा शिंदेला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. तिलाच बिग बॉस या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळावे अशी तिच्या फॅन्सची इच्छा आहे आणि त्यासाठी ते जोरदार प्रयत्न देखील करत आहेत. बिग बॉस या कार्यक्रमाचे सामान्य लोक नव्हे तर सेलिब्रेटी देखील फॅन आहेत. या कार्यक्रमात आपल्याला जायला मिळावे अशी अनेकांची इच्छा असते. बिग बॉस या कार्यक्रमात जायला आवडेल का असे नुकतेच शुभांगी अत्रेला एका मुलाखतीत विचारण्यात आले होते. त्यावर मला बिग बॉसच्या घरात जायला नक्कीच आवडेल अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. त्यामुळे पुढील कोणत्या सिझनमध्ये प्रेक्षकांना शुभांगी दिसली तर त्यात नवल वाटायला नको. 
बिग बॉस या कार्यक्रमाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. या कार्यक्रमाचा फिनाले लवकरच होणार असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. विकास गुप्ता, हिना खान, शिल्पा शिंदे, आकाश ददलानी, पुनित शर्मा हे पाचच स्पर्धक सध्या बिग बॉसच्या घरात असून यांच्यामधून कोण विजेता ठरेल याबाबत प्रत्येक जण आपली मतं नोंदवत आहेत. शुभांगी अत्रेने देखील या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरेल याविषयी तिचे मत सांगितले आहे. या कार्यक्रमाचा विजेता विकास गुप्ता असावा अशी तिची इच्छा आहे. 

Also Read : शिल्पा शिंदेने सोशल मीडियावर केला हा रेकॉर्ड

Web Title: Anguri Bhabhi means Shubhangi Atre expressed desire