तीव्र उन्हाच्या झळांमुळे वैतागली अमृता देशमुख; म्हणाली, 'खूप उन्हाळे पाहिले, आता...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 01:45 PM2024-05-24T13:45:51+5:302024-05-24T13:48:04+5:30

Amruta deshmukh:सध्या कडाक्याच्या उन्हामुळे प्रत्येक जण बेजार झाला आहे. त्यामुळेच अमृतादेखील या कडक उन्हाला वैतागली आहे.

amruta Deshmukh frustrated by intense heat Said Seen many summers now | तीव्र उन्हाच्या झळांमुळे वैतागली अमृता देशमुख; म्हणाली, 'खूप उन्हाळे पाहिले, आता...'

तीव्र उन्हाच्या झळांमुळे वैतागली अमृता देशमुख; म्हणाली, 'खूप उन्हाळे पाहिले, आता...'

अमृता देशमुख (amruta deshmukh) हे नाव मराठी कलाविश्वासाठी नवीन नाही. मालिका आणि नाटक या दोन्ही माध्यमांमध्ये तिचा सक्रीय वावर आहे. त्यामुळे  वरचेवर ती नेटकऱ्यांमध्ये चर्चेत येत असते. अमृता सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्यातील किस्से,घडामोडीही चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

सध्या कडाक्याच्या उन्हामुळे प्रत्येक जण बेजार झाला आहे. सहाजिकच आहे या उन्हाच्या तडाख्यापासून कोणीही सुटलेलं नाही. त्यामुळेच अमृतादेखील या कडक उन्हाला वैतागली असून तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. परंतु, हे फोटो शेअर करत तिने दिलेलं कॅप्शन सध्या चर्चेत आलं आहे.

अमृताने मस्टर्ड कलरच्या ड्रेसमध्ये तिचं फोटोशूट केलं आहे. सोबतच 'खूप उन्हाळे पाहिले...आता पावसाळे बघायचेत राव...' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. 

दरम्यान, अमृताचा हा क्लासी समर लूक चाहत्यांना कमालीचा आवडला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्या लूकचही कौतुक केलं आहे. अमृता सध्या तिच्या नाटकांमध्ये बिझी आहे. नाटकाच्या निमित्ताने ती विदेशातही दौरे करत आहे. अमृताने काही महिन्यांपूर्वीच अभिनेता प्रसाद जवादे याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

Web Title: amruta Deshmukh frustrated by intense heat Said Seen many summers now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.