अमृता देशमुख-प्रसाद जवादेकडे आहे गुडन्यूज; व्हिडीओ शेअर करत म्हणाले- "थोड्याच दिवसांत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:20 IST2025-10-29T16:20:10+5:302025-10-29T16:20:48+5:30
आतादेखील अमृताने दिवाळीनिमित्तचा खास व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये तिने दिवाळी सेलिब्रेशनबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे. अमृताच्या या व्लॉगमध्ये तिच्यासोबत प्रसादही दिसत आहे.

अमृता देशमुख-प्रसाद जवादेकडे आहे गुडन्यूज; व्हिडीओ शेअर करत म्हणाले- "थोड्याच दिवसांत..."
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. बिग बॉसच्या घरात अमृता आणि प्रसादचं सूत जुळलं. घरात त्यांची घट्ट मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. अमृता आणि प्रसादने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अमृता युट्यूबच्या व्लॉगमधून चाहत्यांसोबत अनेक गोष्टी शेअर करत असते.
आतादेखील अमृताने दिवाळीनिमित्तचा खास व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये तिने दिवाळी सेलिब्रेशनबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे. अमृताच्या या व्लॉगमध्ये तिच्यासोबत प्रसादही दिसत आहे. या व्लॉगमध्ये अमृता म्हणते, "आमच्याकडे अजून एक न्यूज आहे. ती तुम्हाला थोड्याच दिवसात कळेल". अमृताने असं म्हटल्यावर प्रसाद तिच्याकडे कॅमेरा फिरवत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर अमृता म्हणते की "हे असं काहीच नाहीये. तूच जर मला विचारत असशील तर ती न्यूज नक्कीच नाहीये. ही प्रसादच्या अंगातली मस्ती आहे".
या व्हिडीओतून अमृता आणि प्रसादने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसाद आणि अमृताने २०२३ मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. सध्या प्रसाद 'पारू' मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. तर अमृता 'लक्ष्मी निवास' या मालिकेत पाहुणी कलाकाराची भूमिका साकारत आहे.