तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर 'अली बाबा-दास्तान ए काबुल’ मालिकेचं शूटिंग ठप्प, आता कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 18:05 IST2022-12-26T17:52:51+5:302022-12-26T18:05:01+5:30
तुनिषा शर्माच्या निधनानंतर 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल'ची शूटिंग तातडीने थांबवण्यात आली. तिनं सेटवरचं आत्महत्या केली होती.

तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर 'अली बाबा-दास्तान ए काबुल’ मालिकेचं शूटिंग ठप्प, आता कारण आलं समोर
Tunisha Sharma Show Ali Baba: Dastaan-E-Kabul Stopped: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबर २०२२ रोजी 'अली बाबा दास्तान-ए-काबुल'च्या सेटवर आत्महत्या केली. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिचा सहकलाकार अभिनेता शिजान खान (Sheezan Khan)ला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या शोमध्ये तो तुनिषासोबत मुख्य भूमिकेत होता. तुनिषाचा मृत्यू आणि शिजान पोलिसांच्या ताब्यात असल्याने शोचे निर्माते अडचणीत आले आहेत. शोचे शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तुनिषा शर्माच्या निधनानंतर 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' (अली बाबा: दास्तान-ए-काबुल) ची शूटिंग तातडीने थांबवण्यात आली. पुढे हा शो सुरू होईल की नाही, अशी भीती आहे. शोचे कलाकार आणि क्रू मेंबर्सना आशा आहे की शूटिंग कधीही सुरू होऊ शकते. शोशी संबंधित एका कलाकाराने एका मुलाखतीत सांगितले आहे की, शो पुन्हा ट्रॅकवर कसा आणायचा याचा विचार करण्यासाठी प्रोडक्शन हाऊसला थोडा वेळ लागेल. आता हा शो पुन्हा सुरू होतो की नाही हे येणारा काळच सांगेल.
मुख्य भूमिकेत होते तुनिषा आणि शिजान
'अली बाबा दास्तान ए काबुल' या टीव्ही शोचे शूटिंग या वर्षी जूनमध्ये सुरू झाले आणि त्याचा प्रीमियर 22 ऑगस्ट 2022 रोजी सोनी सबवर सुरू झाला. तुनिषा शर्मा आणि शिजान खान मुख्य भूमिकेत होते. एकीकडे तुनिषानं या जगाचा निरोप घेतला, तर दुसरीकडे शिजान खानला तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सेटवरच तुनिषानं केली आत्महत्या
शनिवारी ३ वाजण्याच्या सुमारास तुनिषा हिनं मालिकेच्या सेटवर शिजान खान याच्या मेकअप रुममध्येच गळफास लावून आत्महत्या केली. जेव्हा आपण शूट करुन मेकअप रुममध्ये परतलो तेव्हा दरवाजा बंद होता आणि तो उघडत नव्हता. त्यामुळे दरवाजा तोडून आत जावं लागलं. आत तुनिषा गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तुनिषाचं शिजानसोबत १५ दिवस आधीच ब्रेकअप झालं होतं, त्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. तुनिषाच्या आईनं शिजानवर तिला धोका दिल्याचा आरोप केलाय.