मतभेदामुळे 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने सोडला 'द कपिल शर्मा शो'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 12:00 IST2022-03-09T12:00:00+5:302022-03-09T12:00:00+5:30
The kapil sharma show: काही काळापूर्वी या शोमधून सुनील ग्रोवरने काढता पाय घेतला होता. त्यानंतर आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याने हा कार्यक्रम सोडल्याचं सांगण्यात येत आहे.

मतभेदामुळे 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने सोडला 'द कपिल शर्मा शो'
छोट्या पडद्यावर गाजत असलेला लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे 'द कपिल शर्मा शो' (the kapil sharma show). आजवर या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची आणि त्यातील कलाकारांची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते. काही काळापूर्वी या शोमधून सुनील ग्रोवरने काढता पाय घेतला होता. त्यानंतर आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याने हा कार्यक्रम सोडल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा शो सोडण्यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे.
'द कपिल शर्मा शो'मधील दादी अनेकांना आवडते. ही भूमिका अभिनेता अली असगर साकारत आहे. मात्र, आता या कार्यक्रमात दादी पुन्हा प्रेक्षकांना भेटणार नाही. कारण, अली असगरने हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, अली असगरने काही मतभेदांमुळे हा शो सोडला आहे. "हे अत्यंत वाईट आहे की, अशा काही घटना घडतात ज्यामुळे तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात. आम्ही एका कुटुंबाप्रमाणे काम केलं आहे. पण, मी शो आणि स्टेज खूप कमी करतोय", असं अली असगर म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "एक वेळ अशी आली की मला प्रोफेशनली लेव्हलवर वाटलं की, आता बास्स. काही मतभेदांमुळे मी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी सतत तेच तेच करत होतो. त्यामुळे मला तिथे काहीच इम्प्रुमेंट करायला वाव मिळत नाही असं वाटत होतं."
दरम्यान, २०१७ मध्ये सुनील ग्रोवरने द कपिल शर्मा शो सोडला होता. त्यानंतर आता अली असगरनेही या शोकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे सध्या हा शो या नव्या कारणामुळे चर्चेत आला आहे.