'बाईsss लग्नाचा काय विचार?' निक्की तांबोळीच्या डायलॉगवर मराठी अभिनेत्याचं धमाल रील व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 14:03 IST2024-09-09T14:02:54+5:302024-09-09T14:03:29+5:30
बिग बॉस मराठी ४ चा विजेता अक्षय केळकरने निक्की तांबोळीच्या डायलॉगवर खास रील केलाय (bigg boss marathi 5, nikki tamboli)

'बाईsss लग्नाचा काय विचार?' निक्की तांबोळीच्या डायलॉगवर मराठी अभिनेत्याचं धमाल रील व्हायरल
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी आहेत. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये एका स्पर्धकाची चर्चा आहे ती म्हणजे निक्की तांबोळी. निक्कीचे घरात सर्वांसोबत वाद झाले आहेत. निक्कीची घरात एन्ट्री झाली त्यानंतर काहीच दिवसांनी निक्कीचा एक डायलॉग लोकप्रिय झाला तो म्हणजे बाईsss. निक्कीने वर्षा उसगांवकर आणि छोटा पुढारीला उद्देशून मारलेल्या बाईsss या खास डायलॉगची खूप चर्चा झाली. याच डायलॉगचा वापर करुन मराठी अभिनेता अक्षय केळकरने खास रील तयार केलंय.
अक्षयचं बाईsss रील चर्चेत
'लग्नाचा काय विचार म्हणतेय माझी आई, अगं भरपूर आहेत पोरी मला लग्नाची नाही आहे घाई, अगं भरपूर आहेत पोरी मला लग्नाची नाही आहे घाई. बाईsss काय हा प्रकार, बाईssss पागल झालाय का?' असे शब्द वापरुन अक्षयने हे खास रील तयार केलंय. अक्षयला त्याच्या 'अबीर गुलाल' मालिकेतील अभिनेत्री पायल जाधव आणि गायत्री दातार यांनीही साथ दिलीय. अक्षयने ज्या गाण्यावर रील केलाय ते मूळ गाणं अभिराज काळे या संगीतकाराने तयार केलंय. अभिराजने निक्कीच्या बाईsss डायलॉगचा वापर करुन हे गाणं तयार केलं असून हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालंय.
निक्कीच्या बाईsss ची चांगलीच चर्चा
निक्की तांबोळीचा बाईsss हा डायलॉग सध्या महाराष्ट्रभर गाजतोय. या डायलॉगचा वापर करुन अभिराज काळेने खास रील तयार केला. हा रील बिग बॉस मराठीमध्ये काही दिवसांपूर्वी जो भाऊचा धक्का झाला त्यात रितेशने दाखवला. निक्कीचा बाईsss हा डायलॉग दहीहंडीच्या एका कार्यक्रमातही वाजला होता. या डायलॉगवर गोविंदा पथकांनी धमाल डान्स केलेला दिसला. अशाप्रकारे घरात आणि घराबाहेर निक्की तांबोळीची चांगलीच चर्चा आहे.