'अनिल कपूरही तुमचे फॅन होतील', ऐश्वर्या-अविनाश नारकर यांच्या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 12:02 IST2024-08-06T12:02:33+5:302024-08-06T12:02:54+5:30

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी अक्षय कुमार-तापसी पन्नूच्या गाण्यावर धमाल डान्स केलाय

aishwarya narkar and avinash nakar dance video viral from hauli hauli song by akshay kumar taapsee pannu | 'अनिल कपूरही तुमचे फॅन होतील', ऐश्वर्या-अविनाश नारकर यांच्या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

'अनिल कपूरही तुमचे फॅन होतील', ऐश्वर्या-अविनाश नारकर यांच्या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे मराठी मनोरंजन विश्वातील चिरतरुण जोडपं म्हणून ओळखलं जातं. दोघंही गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. दोघांच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत पण दोघांचे रील्स व्हिडीओही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. ऐश्वर्या - अविनाश नारकर यांनी नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यामध्ये दोघांनीही पंजाबी गाण्यावर कमाल डान्स केलेला दिसतोय. 

अक्षय कुमारच्या गाण्यावर धमाल डान्स

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर यांनी नुकताच नवीन डान्स व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत अविनाश नारकर यांनी गुलाबी रंगाचं शर्ट घातलं असून ऐश्वर्या यांनी लाल रंगाचा ड्रेस परिधान केलाय. अक्षय कुमार आणि तापसी पन्नू यांच्या आगामी 'खेल खेल में' सिनेमातलं हे गाणं आहे. 'हौली हौली' असं या गाण्याचं नाव असून ऐश्वर्या - अविनाश नारकर यांनी कमाल डान्स करत सर्वांचं मन जिकलंय. 


चाहत्यांनी दोघांच्या डान्स व्हिडीओचं केलं कौतुक

ऐश्वर्या-अविनाश नारकर यांच्या डान्स व्हिडीओचं त्यांच्या चाहत्यांनी चांगलंच कौतुक केलं. 'ओहह हो क्या बात है. पंजाबी कुडी आणि पंजाबी मुंडा', 'अनिल कपूर सुद्धा तुमचे फॅन होतील', 'मनाने कायम तरुण आणि सकारात्मक एनर्जी देणारं जोडपं', अशा शब्दात लोकांनी ऐश्वर्या-अविनाश नारकर यांच्या डान्स व्हिडीओचं कौतुक केलंय. दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अविनाश नुकतेच 'डंका' या मराठी सिनेमात दिसले. तर ऐश्वर्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत झळकत आहेत.

Web Title: aishwarya narkar and avinash nakar dance video viral from hauli hauli song by akshay kumar taapsee pannu