योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:08 IST2025-10-28T17:08:06+5:302025-10-28T17:08:33+5:30
नुकतंच 'जीव माझा गुंतला' मालिकेतून घराघरात पोहचलेले योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या नात्यात वादळ आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आता मराठी कलाविश्वातील आणखी एका अभिनेत्रीच्या संसारात वादळ आल्याचे समोर आले आहे. आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहचलेली ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून नवऱ्यापासून वेगळी राहते आहे.

योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
मराठी सिनेविश्वात एकीकडे कुणी लग्नबेडीत अडकत आहे तर दुसरीकडे काही जोडप्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतंच 'जीव माझा गुंतला' मालिकेतून घराघरात पोहचलेले योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या नात्यात वादळ आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आता मराठी कलाविश्वातील आणखी एका अभिनेत्रीच्या संसारात वादळ आल्याचे समोर आले आहे. आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहचलेली ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून नवऱ्यापासून वेगळी राहते आहे. तिचा नवरादेखील सिनेइंडस्ट्रीत दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे.
आई कुठे काय करते मालिकेत झळकलेली अभिनेत्री अक्षया गुरव आणि दिग्दर्शक भूषण वाणी यांच्या नात्यात दुरावा आल्याचं समजतं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ते दोघे वेगळे राहत आहेत. तसेच सोशल मीडियावर त्यांनी एकमेकांना अनफॉलोदेखील केले आहे. त्या दोघांच्या सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटोदेखील पाहायला मिळत नाही आहेत. याशिवाय लग्नाचे फोटोदेखील त्यांनी डिलीट केले आहेत. यावरून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात आहे. अद्याप अक्षया आणि भूषणने यावर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही.

लग्नाच्या ८ वर्षांनंतर नात्यात आला दुरावा
अक्षया आणि भूषण एकमेकांना एका कॉमन फ्रेंडच्या घरी भेटले होते आणि पहिल्याच भेटीमध्ये भूषणचे वागणे-बोलणे पाहून अक्षया त्याच्या प्रेमात पडली. अगदी काही महिने डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. २३ मे, २०१७ साली ते लग्नबेडीत अडकले. लग्नाच्या ८ वर्षांनंतर आता ते वेगळे झाले असल्याचे बोलले जात आहे.