गौरव मोरेनंतर आणखी एका अभिनेत्याने गुपचुप केला साखरपुडा? फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 09:32 IST2026-04-12T09:31:11+5:302026-04-12T09:32:28+5:30
नुकतंच अभिनेता गौरव मोरेने गुपचुप लग्न करुन सर्वांना सुखद धक्का दिला. आता गौरव मोरेनंतर आणखी एक अभिनेत्याने गुपचुप लग्न केलं असल्याची चर्चा आहे

गौरव मोरेनंतर आणखी एका अभिनेत्याने गुपचुप केला साखरपुडा? फोटो व्हायरल
नुकतंच अभिनेता गौरव मोरेने गुपचुप लग्न करुन सर्वांना सुखद धक्का दिला. आता गौरव मोरेनंतर आणखी एक अभिनेत्याने गुपचुप लग्न केलं असल्याची चर्चा आहे. 'बिग बॉस १८' (Bigg Boss 18) मधून घराघरात पोहोचलेली जोडी ईशा सिंग (Eisha Singh) आणि अविनाश मिश्रा (Avinash Mishra) सध्या त्यांच्या एका फोटोमुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने अविनाशचा हात हातात घेतला असून तिच्या हातात अंगठी देखील पाहायला मिळत आहे. या फोटोमुळे या दोघांनी गुपचूप साखरपुडा किंवा 'रोका' उरकला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
काय आहे व्हायरल फोटोचे सत्य?
ईशा आणि अविनाशची मैत्री बिग बॉसच्या घरापासूनच चर्चेत आहे. या जोडीला चाहते प्रेमाने 'अविशा' (AviSha) म्हणून हाक मारतात. ईशाने इंस्टाग्रामवर जो फोटो शेअर केला आहे, त्यातून त्यांच्या एंगेजमेंटच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. अनेक चाहत्यांनी कमेंट्समध्ये त्यांचे अभिनंदन करण्यासही सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप या दोघांनीही आपल्या नात्यावर किंवा साखरपुड्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नाही.
यापूर्वीही जेव्हा त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्या आल्या होत्या, तेव्हा ईशा सिंगच्या आईने या केवळ अफवा असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होती. ईशानेही एका मुलाखतीत स्पष्ट केले होते की, जोपर्यंत तिच्या हातात एंगेजमेंट अंगठी दिसत नाही, तोपर्यंत अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका. पण आता खुद्द ईशानेच अंगठीसह फोटो शेअर केल्यामुळे चाहत्यांना हा या दोघांच्या रोका सेरेमनीचाच फोटो असल्याचे वाटत आहे.
बिग बॉस १८ मध्ये अविनाश तिसरा रनर-अप ठरला होता, तर ईशा सहाव्या स्थानावर होती. शो संपल्यानंतरही या दोघांची मैत्री कायम असून त्यांनी अनेक म्युझिक व्हिडिओ आणि ट्रॅव्हल फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. 'नागिन ७' सारख्या मालिकेत ईशा झळकली. आता ही व्हायरल झालेली अंगठी खरोखरच त्यांच्या आयुष्यातील नवीन सुरुवातीची खूण आहे की एखाद्या आगामी प्रोजेक्टचा भाग, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.