पहिल्या घटस्फोटानंतर दुसरा संसार थाटण्यास सज्ज झाली ही अभिनेत्री,पाहा मेहंदीपासून ते हळदीपर्यंतचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 07:36 AM2018-02-21T07:36:38+5:302018-02-21T13:06:38+5:30

छोट्या पडद्यावरचे ऑनस्क्रीन कपल दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.22 फेब्रुवारीमध्ये कुटूंबीय,नातेवाईक,मित्रमैत्रीणींच्या उपस्थित हे ...

After the first divorce, the actress was ready to take the second world, from the look of Mehndi to Haldi | पहिल्या घटस्फोटानंतर दुसरा संसार थाटण्यास सज्ज झाली ही अभिनेत्री,पाहा मेहंदीपासून ते हळदीपर्यंतचे फोटो

पहिल्या घटस्फोटानंतर दुसरा संसार थाटण्यास सज्ज झाली ही अभिनेत्री,पाहा मेहंदीपासून ते हळदीपर्यंतचे फोटो

googlenewsNext
ट्या पडद्यावरचे ऑनस्क्रीन कपल दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.22 फेब्रुवारीमध्ये कुटूंबीय,नातेवाईक,मित्रमैत्रीणींच्या उपस्थित हे दोघेही लग्नबंधनता अडकणार आहेत.'ससुराल सिमर का' मालिकेमुळे सिमर बनत दिपिकाला अमाप लोकप्रियता मिळाली होती.हे दोघंही लखनऊमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करत आहेत.सध्या दोघेही लग्नाआधीच्या पार पडणा-या पारंपरिक कार्यक्रमात बिझी असल्याचे त्यांनी शेअर केलेल्या फोटोत पाहायला मिळत आहे.दीपिका आणि शोएबच्या लग्नाच्या तयारीचे काही फोटोज समोर आले आहेत.फोटो पाहून दोघांचे चाहते त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.



'ससुराल सिमर का' या मालिकेत एंट्री होण्याआधी दीपिकाचे पहिले लग्न झालेले होते.मात्र काही कारणास्तव तिचे लग्न तुटले.त्यानंतर तिच्या कठीण काळात शोएबने तिला आधार दिला आणि तिची मदत केली.दुसरीकडे शोएबच्या पडत्या काळात दीपिकाने त्याला साथ दिली. त्याच्या पाठिशी ठामपणे ती उभी राहिली.त्याच काळात ते एकमेकांच्या कधी प्रेमात पडले हेच त्यांना कळले नाही.प्रेमात असल्याचे जाणवताच त्यांनी लग्न करण्याच निर्णय घेतला होता.मात्र त्यांना त्यांच्या या प्रेमाची जाणीव झाली तो क्षण होता.शोएबने ससुराल सिमर का ही मालिका सोडल्यानंतर दोघांनाही एकमेकांची कमतरता जाणवू लागली.या काळात दिपिका फार खचून गेली होती.त्यानंतर मात्र दोघे जवळ आले आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.गेल्या तीन-साडे तीन वर्षांपासून ते एकमेंकांना डेट केल्यानंतर आता लग्नबंधनात अडकणार आहे.

दीपिकाने 2013 मध्ये लव्ह मॅरेज केले होते.परंतू 2015 मध्ये तिचा काही कारणामुळे घटस्फोट झाला.दीपिकाने शोएबमुळे तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला असल्याचेही बोलले जाते.दीपिकाने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटेल होते की,"लव्ह मॅरेज यशस्वी होतातच हे गरजेचे नाही. यामध्येही ब-याचदा अनेक समस्या येत असतात.कोणतेही नाते टिकवण्यासाठी दोन्ही बाजुंनी बाँडींग असणेही तितकेच गरजेचे आहे. कदाचित पती पत्नीमध्ये असणारे बाँडींग निर्माण झाले नसल्यामुळे मी घटस्फोट घेतला असल्याचे सांगितले.यांत तिच्या फॅमिलीनेही तिला पूर्ण सपोर्ट केला आहे. शोएबनेही तिच्या कठिण काळात मदत केली असल्याचेही तिने सांगितले.

Web Title: After the first divorce, the actress was ready to take the second world, from the look of Mehndi to Haldi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.