​आदित्य रेडजीने पोरस या मालिकेसाठी केले मुंडन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 06:30 AM2017-12-06T06:30:50+5:302017-12-06T12:00:50+5:30

पोरस राजाच्या आयुष्यावर आधारित पोरस ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेच्या कथानकाचे, ...

Aditya Radge Banerjee for the series 'Poros' | ​आदित्य रेडजीने पोरस या मालिकेसाठी केले मुंडन

​आदित्य रेडजीने पोरस या मालिकेसाठी केले मुंडन

googlenewsNext
रस राजाच्या आयुष्यावर आधारित पोरस ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेच्या कथानकाचे, या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेचे प्रेक्षक कौतुक करत आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात या मालिकेविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळत आहे. या मालिकेत लक्ष लालवाणी, सुहानी धानकी, रती पांडे, आदित्य रेडजी, प्रणित भट्ट यांसारखे कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष या मालिकेत पोरसची प्रमुख भूमिका साकारत आहे. 
पोरस या मालिकेचे बजेट हे जवळजवळ ५०० कोटींच्या घरात असून ही मालिका अतिशय भव्य आहे. पोरस या मालिकेची कथा ख्रिस्तपूर्व ३२६ च्या काळातील आहे. त्यामुळे प्राचीन काळातील वैभव उभे करण्यासाठी आणि तो काळ जिवंत करण्यासाठी अगदी छोट्यातील छोट्या गोष्टीकडे देखील बारकाईने लक्ष दिले जात आहे.
पोरस या मालिकेच्या येत्या भागात आता अनुसूया म्हणजेच रती पांडे बामनी म्हणजेच आदित्य रेडजीचे मुंडन करताना दिसणार आहे. या मालिकेतील हा सीन खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आपल्या व्यक्तिरेखेस खराखुरा लुक देण्यासाठी आदित्यने खरोखरच आपले केस कापले आहेत. या मालिकेच्या पुढील भागांमध्ये अनुसूया बामनी आणि आपल्या गर्भस्थ शिशुच्या जीवनासाठी बामनीचे मुंडन करताना दिसणार आहे. पण असे करताना बामनी कोसळणार आहे. कारण मुंडन करण्यासाठी वापरण्यात आलेला वस्तरा विषारी असणार आहे. हा वस्तरा विषारी आहे हे अनुसूयेला कळल्यावर तिला धक्काच बसणार आहे.
चित्रीकरणाच्या वेळी रतीला आदित्यचे केस कापायची संधी मिळाली. आयुष्यात पहिल्यांदा कोणाचे तरी केस कापायला रती खूपच उत्सुक होती. रतीला आदित्यचे केस कापायला फारसा वेळ लागला नाही. ती हे दृश्य चित्रीत करण्यास खूपच उत्सुक होती. आपली  व्यक्तिरेखा अधिक चांगल्या प्रकारे खुलून यावी यासाठी आदित्यने रतीला आपले केस कापण्याची मुभा देण्याचे ठरवले आणि रतीने देखील हे काम आनंदाने केले. 

Also Read : ‘भूमिका साकारणं माझ्यासाठी आव्हान’ - लक्ष लालवानी


Web Title: Aditya Radge Banerjee for the series 'Poros'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.