"यावर्षी ट्रॉफी मलाच पाहिजे!"; 'बिग बॉस मराठी ६'मध्ये जाण्याआधीच अभिनेत्रीने ठणकावून सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:44 IST2026-01-12T15:42:05+5:302026-01-12T15:44:08+5:30
'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्रीने घरात जाण्याआधी तिची इच्छा व्यक्त केली आहे. काय म्हणाली अभिनेत्री?

"यावर्षी ट्रॉफी मलाच पाहिजे!"; 'बिग बॉस मराठी ६'मध्ये जाण्याआधीच अभिनेत्रीने ठणकावून सांगितलं
'बिग बॉस मराठी ६' ला धमाकेदार सुरुवात झाली आहे. या नव्या पर्वात विविध क्षेत्रातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. अशातच या सीझनमध्ये बॉलिवूड गाजवलेली एक प्रसिद्ध अभिनेत्री सहभागी झाली आहे. तब्बल १० वर्षांनी ही अभिनेत्री पुन्हा 'बिग बॉस'च्या घरात आली आहे. याआधी 'बिग बॉस' हिंदीचं ८ वं पर्व गाजवणारी ती आता 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन गाजवायला सज्ज आहे. कोण आहे ती?
ही आहे सोनाली राऊत. सोनाली राऊतचा घरात जाण्याआधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सोनाली म्हणते, ''आता मी १० वर्षांनंतर पुन्हा माझी पॅकिंग सुरु केली आहे. आता मी पुन्हा बिग बॉसमध्ये चाललेय आणि यावेळेस मी मराठी बिग बॉसमध्ये चालले आहे. तुम्हाला दिसतंय माझ्या रुमचं किती कल्याण, दिवा, ठाणा, मुंब्रा झालं आहे.''
''मी खूप उत्सुक आहे. मला खात्री आहे तुम्हीही उत्सुक आहात. यावर्षी मलाच ट्रॉफी पाहिजे आणि मलाच तुम्ही वोट करणार आणि मलाच खूप सारं प्रेम देणार. मी सुद्धा तुमचं मनोरंजन होईल याची खात्री देते. मला प्लीज सपोर्ट करा आणि वोट करा.'', अशा शब्दात सोनालीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी झालेली सोनाली राऊत ही अभिनेत्री असून तिने बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. 'ग्रेट ग्रँड मस्ती', 'द एक्सपोज' या सिनेमांमध्ये सोनाली झळकली. इतकंच नव्हे सोनालीने ग्रेट ग्रँड मस्ती सिनेमात रितेश देशमुखसोबत काम केलं.