VIDEO: प्रसिद्ध अभिनेत्रीने हाताने घडवली बाप्पाची सुबक मूर्ती, कलेचं होतंय कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 18:28 IST2025-08-17T18:23:10+5:302025-08-17T18:28:22+5:30

एक पाय सोडून ऐटीत बसलाय देखणा बाप्पा! मराठमोळ्या अभिनेत्रीने साकारला सुंदर 'बालगणेश', VIDEO पाहा

actress shweta mahadik creates beautiful idol of bappa by hand her skill is being praised shared video on social media | VIDEO: प्रसिद्ध अभिनेत्रीने हाताने घडवली बाप्पाची सुबक मूर्ती, कलेचं होतंय कौतुक!

VIDEO: प्रसिद्ध अभिनेत्रीने हाताने घडवली बाप्पाची सुबक मूर्ती, कलेचं होतंय कौतुक!

Shweta Mahadik Video: श्रीगणेशाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सध्या सर्वत्र लगबग सुरू झाली आहे.  घरोघरी गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली आहे. साफसफाई, रंगरंगोटी तसेच मखरांची तयारी करण्यात येत आहे. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची लगबग रंगात आली आहे. ढोल-ताशांच्या निनादात गणेश मंडळ सजत आहेत.भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाची लहर आहे.अशातच सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. ही अभिनेत्री म्हणजे श्वेता महाडिक आहे. 


सध्या अभिनेत्री  श्वेता महाडिकनेही आपल्या घरी गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.याचा  एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे यांची सून म्हणजेच अभिनेत्री श्वेता महाडिक भेंडे हिने बालगणेशाची सुरेख अशी मूर्ती साकारली आहे. बरेच कलाकार इकोफ्रेंडली मूर्तींना प्राधान्य हाताने बाप्पा साकारतात.अभिनेत्री श्वेता महाडीकनेही अशीच बाप्पाची सुंदर आणि सुबक साकारलेली मूर्ती साकारून त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  प्रोफेशनल आर्टिस्टलाही लाजवेल अशी सुरेख बनलेली आहे.श्वेताने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून मराठीतील अनेक सेलिब्रिटींनी तिच्या कौशल्याचं कौतुक केलंय. सध्या मागील काही वर्षांपासून कलाविश्वात फारशी सक्रिय नसल्याचं दिसतंय.मात्र, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. 

वर्कफ्रंट

श्वेता महाडीकच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने 'गुड्डन तुमसे ना हो पायेगा', 'बालिका वधू' अशा हिंदी मालिका तसेच 'लोकमान्य' या मराठी चित्रपटात श्वेताने अभिनय केला आहे.श्वेता महाडिक सोशल मीडियावर नेहमीच क्रिएटिव्ह आयडियाज नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते. त्यात अभिनेत्रीने तिच्या बाप्पाची खास झलक चाहत्यांना दाखवली आहे. 

Web Title: actress shweta mahadik creates beautiful idol of bappa by hand her skill is being praised shared video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.