शुभांगी गोखलेंच्या भावाचं निधन, 'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेत दोघांनी एकत्र केलेलं काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:31 IST2025-08-22T16:30:24+5:302025-08-22T16:31:48+5:30
अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या भावाचं निधन झालं आहे. शुभांगी यांचे भाऊ अभिनेते होते हे फार कमी जणांना ठाऊक असेल

शुभांगी गोखलेंच्या भावाचं निधन, 'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेत दोघांनी एकत्र केलेलं काम
मराठी मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या भावाचं निधन झालंय. शुभांगी यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन ही दुःखद बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. शुभांगी यांच्या भावाचं नाव रविंद्र संगवई असं आहे. शुभांगी यांनी रविंद्र यांचा फोटो पोस्ट करुन ही बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. फार कमी जणांना माहित असेल की शुभांगी आणि रविंद्र या बहीण-भावाने 'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेत एकत्र काम केलं होतं.
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेत शुभांगी-रविंद्र झळकले होते
रविंद्र संगवई हे पेशाने रिझर्व्ह बँकेत एक्झिक्यूटिव्ह चीफ मॅनेजर होते. त्यांनी काही वर्ष सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरीही केली. परंतु करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी 'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेत काम केलं होतं. मालिकेत त्यांनी क्षिती जोगच्या वडिलांची भूमिका साकारली होती. अगदी कमी भागात रविंद्र झळकले होते. परंतु त्यांची भूमिका आजही सर्वांच्या स्मरणात आहे.
'बालपण संपले माझे.. रविदादा, खूप एकटं पाडून गेलास', अशा भावुक शब्दात शुभांगी गोखलेंनी भावाला श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी रविंद्र यांना श्रद्धांजली वाहून शुभांगी यांना धीर दिला आहे. शुभांगी यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, त्या सध्या 'असेन मी नसेन मी' या नाटकात काम करत आहेत. या नाटकात त्यांच्यासोबत अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची भूमिका आहे.