अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या पायाला गंभीर दुखापत; जखमी पायानेच केला नाटकाचा प्रयोग, चाहते चिंतेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 18:04 IST2026-03-24T18:01:16+5:302026-03-24T18:04:16+5:30

शिवानी रांगोळेच्या पायाला गंभीर दुखापत, पोस्ट शेअर करत दिली माहिती

actress shivani rangole leg seriously injured fans are worried after seeing her post | अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या पायाला गंभीर दुखापत; जखमी पायानेच केला नाटकाचा प्रयोग, चाहते चिंतेत 

अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या पायाला गंभीर दुखापत; जखमी पायानेच केला नाटकाचा प्रयोग, चाहते चिंतेत 

Shivani Rangole: अभिनेत्री शिवानी रांगोळे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.  बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या शिवानीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बन मस्का' या मालिकेमुळे शिवानीला लोकप्रियता मिळाली. त्याचबरोबर अलिकडेच शिवानी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेतील तिच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी शिवानी रंगभूमीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात आहे.  याचदरम्यान, अभिनेत्रीच्या पायाला दुखापत झाली आहे.  सोशल मीडियावर अभिनेत्रीने पोस्ट शेअ करत  तिच्या पायाला झालेल्या दुखापतीविषयी एक अनुभव शेअर केला.


शिवानी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. याद्वारे तिच्या आयुष्यातील अपडेट्स तसेच शूटिंग सेटवर होणारी मजा मस्ती ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.आता सुद्धा तिने एक पोस्ट  शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून तिचे चाहते चिंतेत आहेत. सध्या रंगभूमीवर शिवानीचं शंकर-जयकिशन हे नाटक सुरु आहेत. याचवेळी तिच्या पायाला दुखापत झाली आहे. शिवानीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. 

आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने लिहिलंय,"नाटक करायला एका पायावर तयार! पायाला दुखापत झाली तेव्हा प्रयोग कसे होणार ह्याचं टेन्शन होतं. पण नाट्यगृहात पाय ठेवण्याच्या क्षणापासून ते मेकअप रूममध्ये मला तयार होताना मदत करणं, नाटका आधीचा जो प्रॉपर्टी चेक मी करते तो माझ्या वतीने करून ठेवणं, मला चालायला वेळ लागतो म्हणून ब्लॅकआउटचा अवधी वाढवणं,नाटकात काही मूव्हमेंट्स ऐनवेळी माझ्या सोयीनी बदलणं, नाटक झाल्यावर मला गाडीपर्यंत सुखरूप सोडणं, हे सगळं माझ्या शंकर जयकिशनच्या सगळ्या टीमनी केलं. "

यानंतर तिने लिहिलंय, "मला कित्येकदा पायात splinter आहे ह्याची जाणीव ही व्हायची नाही,उत्साहात मी स्टेजवर वावरायचे तेव्हा @sahibharat sir,@maheshmanjrekar sir मला आठवण करून द्यायचे, मला सांभाळून घ्यायचे! तेव्हा खूप कृतज्ञता वाटली!! स्टेज वर जाईपर्यंत टेन्शन असायचं की पायामुळे प्रयोग कसा होईल, पण एकदा प्रेक्षकांचा आवाज ऐकला की हुरूप यायचा! आता हळूहळू recovery होते आहे पण माझ्या टीमसाठी आणि प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. "अशी पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना माहिती दिली आहे. शिवानीची ही पोस्ट पाहून चाहेत ती लवकरच बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. शिवाय अनेकांनी तिला काळजी घेण्यास  सांगितलं आहे. 

Web Title : अभिनेत्री शिवानी रांगोळे घायल, घायल पैर से किया नाटक

Web Summary : शिवानी रांगोळे के पैर में फ्रैक्चर हो गया, फिर भी उन्होंने 'शंकर-जयकिशन' नाटक में अभिनय किया। उन्होंने सोशल मीडिया पर अपने अनुभव साझा किए और अपनी टीम और प्रशंसकों को उनके समर्थन और शुभकामनाओं के लिए धन्यवाद दिया।

Web Title : Actress Shivani Rangole Injured, Performs Play with Injured Foot

Web Summary : Shivani Rangole fractured her foot but continued performing in her play 'Shankar-Jaykishan'. She shared her experience on social media, thanking her team and fans for their support and well wishes during her recovery.