रुद्रप्रताप अन् गिरीजाच्या आयुष्यात नवं वादळ येणार! ‘नशीबवान’ मालिकेत 'या' अभिनेत्रीची एन्ट्री होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:51 IST2025-12-03T18:47:14+5:302025-12-03T18:51:18+5:30
रुद्रप्रताप अन् गिरीजाच्या आयुष्यात नवं वादळ! 'या'अभिनेत्रीच्या एन्ट्रीने येणार कहानीमध्ये ट्विस्ट,प्रोमो बघाच

रुद्रप्रताप अन् गिरीजाच्या आयुष्यात नवं वादळ येणार! ‘नशीबवान’ मालिकेत 'या' अभिनेत्रीची एन्ट्री होणार
Nashibvaan Serial: अभिनेता आदिनाथ कोठारे आणि नेहा नाईक यांची प्रमुख भूमिका असलेली 'नशीबवान' ही मालिका १५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आली. अगदी पहिल्याच दिवसापासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. सध्या या मालिकेचं कथानक एका उत्कंठावर्धक वळणावर आहे. लवकरच रुद्रप्रताप आणि गिरीजा लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अशातच आता मालिकेत छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीच्या एन्ट्रीने अजून एक ट्विस्ट येणार आहे.
नुकताच सोशल मिडियावर नशीबवान मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये रुद्रप्रताप आणि गिरीजाच्या साखरपुड्याचा सीक्वेन्स दाखवण्यात आला आहे. याच दरम्यान, एका नव्या पात्राची एन्ट्री मालिकेत करण्यात आली आहे. या अभिनेत्रीचं नाव सानिका मोजार आहे. “शेवटी जे ज्याचं आहे ते त्यालाचं मिळणार”…", असं कॅप्शन देत स्टार प्रवाह वाहनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा व्हायरल प्रोमो पाहून मालिका रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घ्यायला प्रत्येकजण उत्सुक आहे.
सानिकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सानिका ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.तिने 'लय आवडतेस तू मला' या मालिकेत काम केलं आहे.