'सपने सुहाने लडकपन के'मधली गुंजन कुठे गायब झाली? रुपल त्यागी आता कशी दिसते बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 17:29 IST2025-06-03T17:29:02+5:302025-06-03T17:29:45+5:30

रुपलने बॉलिवूड कलाकारांना केलंय कोरिओग्राफ

actress roopal tyagi from sapne suhane ladakpan ke know how she looks now | 'सपने सुहाने लडकपन के'मधली गुंजन कुठे गायब झाली? रुपल त्यागी आता कशी दिसते बघा

'सपने सुहाने लडकपन के'मधली गुंजन कुठे गायब झाली? रुपल त्यागी आता कशी दिसते बघा

टेलिव्हिजनवरील 'सपने सुहाने लडकपन के' ही मालिका आठवतेय? २०१२ साली ही मालिका आली आणि लोकप्रिय झाली होती. रचना आणि गुंजन या दोन मुलींची ती कहाणी होती. अभिनेत्री महिमा मकवाना रचनाच्या भूमिकेत होती. तर गुंजन ही भूमिका अभिनेत्री रुपल त्यागीने (Roopal Tyagi) निभावली. महिमा मकवाना सध्या बॉलिवूडमध्ये दिसते पण रुपल त्यागी कुठे गायब झाली असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

अभिनेत्री रुपल त्यागीने 'सपने सुहाने लडकपन के' नंतर 'शक्ति अस्तित्व के एहसास की','लाल इश्क','रंजू की बेटिया' या मालिकाही केल्या. ती 'बिग बॉस ९' मध्येही सहभागी झाली. मात्र तिला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. आता ती स्क्रीनपासून दूर गेली आहे. रुपल सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती उत्तम डान्सर आहे आणि डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे १.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिला शेवटचं २०२१ साली 'बेटियां' शोमध्ये बघितलं गेलं. सध्या ती क्लोदिंग बिझनेसही करत आहे.


 

बॉलिवूड कलाकारांना शिकवला डान्स

रुपलने डान्सचं रीतसर प्रशिक्षण घेतलं आहे आणि ती कोरिओग्राफरही आहे. तिने मालिकेत यायच्या आधी 'चुप चुप के'मध्ये शाहीद कपूर आणि करीना कपूरला कोरिओग्राफ केल आहे. इतकंच नाही तर तिने 'भुलभूलैय्या'साठी विद्या बालनलाही कोरिओग्राफ केलं आहे. मात्र तिला अभिनयाची आवड होती  म्हणून नंतर तिने मालिकेत काम करायला सुरुवात केली.

Web Title: actress roopal tyagi from sapne suhane ladakpan ke know how she looks now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.