पुन्हा एकदा रेखा यांचं कलाविश्वात दमदार पदार्पण; सिनेमा नव्हे तर मालिकेत करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 11:50 IST2023-06-16T11:49:33+5:302023-06-16T11:50:33+5:30

Rekha: रेखा यांनी बऱ्याच वर्षानंतर कलाविश्वात पुन्हा पदार्पण करायचा निर्णय घेतला आहे.

actress rekha to make her tv comeback with ghum hai kisikey pyaar meiin serial | पुन्हा एकदा रेखा यांचं कलाविश्वात दमदार पदार्पण; सिनेमा नव्हे तर मालिकेत करणार काम

पुन्हा एकदा रेखा यांचं कलाविश्वात दमदार पदार्पण; सिनेमा नव्हे तर मालिकेत करणार काम

आपल्या सदाबहार सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेखा (rekha). गेल्या कित्येक वर्षांपासून रेखा सिनेसृष्टीवर राज्य करत आहेत. त्यांचा सध्या कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये, पार्टीमध्ये रेखा आवर्जुन सहभागी होत असतात. त्यामुळे अनेकदा त्यांनी रुपेरी पडद्यावर झळकावं अशी चाहत्यांची इच्छा असते. विशेष म्हणजे चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी काही वर्षांपूर्वीच सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला. त्यामुळे सध्या त्या कोणत्याही सिनेमामध्ये दिसत नाहीत. परंतु, त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यामध्येच रेखा यांनी एक गुडन्यूज शेअर केली आहे. लवकरच त्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र, कोणत्याही सिनेमातून नव्हे तर चक्क एका मालिकेच्या माध्यमातून.

छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरलेली 'गुम हैं किसी के प्यार में' या मालिकेत रेखा झळकणार आहेत. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला. या प्रोमोमध्ये रेखा यांना पाहायला मिळालं. 

'या' व्यक्तीमुळे बिग बींनी उचलला होता रेखावर हात; सिनेमाच्या सेटवर लगावली होती अभिनेत्रीच्या कानशिलात

दरम्यान, यापूर्वीही रेखा छोट्या पडद्यावर झळकल्या आहेत. तसंच गुम हैं किसी के प्यार में या मालिकेसोबत त्यांचा जवळचा संबंध असल्याचं सांगण्यात येतं. या शोच्या सुरुवातीसदेखील त्या मालिकेत झळकल्या होत्या. त्यांनी मालिकेतील नील भट्ट, आयशा सिंग आणि ऐश्वर्या शर्मा या कलाकारांची प्रेक्षकांसोबत ओळख करुन दिली होती.
 

Web Title: actress rekha to make her tv comeback with ghum hai kisikey pyaar meiin serial