Sahkutumb Sahaparivar : ‘सहकुटुंब सहपरिवार’मध्ये झाली नवी एन्ट्री, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 10:30 IST2022-07-03T10:29:49+5:302022-07-03T10:30:44+5:30
Sahkutumb Sahaparivar : मालिकेत नवा चेहरा... ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधील कामिनी आता सहकुटुंब सहपरिवारात आणणार विघ्न?

Sahkutumb Sahaparivar : ‘सहकुटुंब सहपरिवार’मध्ये झाली नवी एन्ट्री, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ‘सहकुटुंब सहपरिवार’ (Sahkutumb Sahaparivar ). या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. सुनील बर्वे, किशोरी अंबिये, कोमल कुंभार, नंदिता पाटकर या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. आता या मालिकेत एक नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. होय, अभिनेत्री पूजा पुरंदरे ( Pooja Purandare) आता स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत एन्ट्री करणार आहे.
पूजाने खुद्द ही माहिती दिली आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पूजानं सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या सेटवर हजेरी लावून शुटींगलाही सुरुवात केली आहे. सेटवरचा एक फोटोही तिने पोस्ट केला आहे.
पूजा या मालिकेत नेमकी काय भूमिका साकारतेय, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण तिच्या एंट्रीने मालिकेला नवीन वळण पाहायला मिळणार, हे नक्की.
पूजा पुरंदरे याआधी कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेत दिसली होती. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत तिने ‘कामिनी’ची ही भूमिका साकारली होती.‘कामिनी’ची निगेटीव्ह भूमिका तिने अतिशय उत्तमरित्या साकारली होती. दौलतरावबरोबर पूजाची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती.
पूजाने आता ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतुन ब्रेक घेतला असून आता ती ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतील तिचा लुक पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. पूजाच्या एंट्रीमुळे ‘सहकुटुंब सहपरिवार; या मालिकेत कोणत्या नवीन घडामोडी घडणार, तिची भूमिका काय असेल याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
पूजा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.