Rasik Dave Death: अभिनेत्री केतकी दवेवर कोसळला दु:खाचा डोंगर, पती रसिक दवे यांचं निधन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 11:27 IST2022-07-30T11:24:28+5:302022-07-30T11:27:15+5:30

Rasik Dave Passes Away : ‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेतील मलखान अर्थात दीपेश भान याच्या अकाली निधनाच्या बातमीतून चाहते सावरतात ना सावरतात तोच, आता मनोरंजनसृष्टीतून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे.

Actress Ketki Dave’s Husband Rasik Dave Passes Away due to kidney failure at 65 | Rasik Dave Death: अभिनेत्री केतकी दवेवर कोसळला दु:खाचा डोंगर, पती रसिक दवे यांचं निधन  

Rasik Dave Death: अभिनेत्री केतकी दवेवर कोसळला दु:खाचा डोंगर, पती रसिक दवे यांचं निधन  

Actress Ketki Dave’s Husband Rasik Dave Passes Away : ‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेतील मलखान अर्थात दीपेश भान याच्या अकाली निधनाच्या बातमीतून चाहते सावरतात ना सावरतात तोच, आता मनोरंजनसृष्टीतून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. हिंदी व गुजराती शो आणि सीरिअलमध्ये काम करणारे अभिनेते रसिक दवे यांचं वयाच्या 65 व्या वर्षी निधन झालं. रसिक दवे हे अभिनेत्री केतकी दवेचे पती आहेत.
 त्यांच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. अभिनेते रसिक दवे यांची शुक्रवारी रात्री 8 वाजता प्राणज्यात मालवली.

रसिक दवे हे किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. गेल्या 15 दिवसांपासून ते रूग्णालयात भरती होते. काल त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते रसिक दवे गेल्या दोन वर्षांपासून डायलिसिसवर होते. रसिक दवे यांची किडनी खराब झाली होती.  रसिक दवे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.  

रसिक दवे यांनी ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्री केतकी दवेसोबत लग्न केलं होतं.  केतकी आणि रसिकची जोडी ‘नच बलिये’ या रिअ‍ॅलिटी शोमध्येही दिसली होती.  या दोघांचाही हिंदी आणि गुजरातीमध्ये मोठा चाहता वर्ग आहे.

रसिक दवे यांनी हिंदी आणि गुजराती मालिका आणि कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. 1982 साली रसिक दवे यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली होती. एका गुजराती चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात झाली. गुजराती आणि हिंदी दोन्ही माध्यमात काम केले. ‘मासूम’ चित्रपटातून त्यांनी  बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक वर्षे इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर रसिक यांनी ‘संस्कार: धरोहर अपना की’ या टीव्ही मालिकेद्वारे इंडस्ट्रीत कमबॅक केलं होतं.  सीआयडी, महाभारत, अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय. महाभारत या मालिकेत त्यांनी नंद हे पात्र साकारलं होतं.

Web Title: Actress Ketki Dave’s Husband Rasik Dave Passes Away due to kidney failure at 65

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.