Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 10:52 IST2025-06-23T10:51:48+5:302025-06-23T10:52:57+5:30

अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत या धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर सर्वांनी प्रश्न उपस्थित केलं आहे

actress jyotsana tamrakar robbber punching his face and escape video viral | Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

एका अभिनेत्रीसोबत चालत्या ट्रेनमध्ये चोरीचा प्रसंग घडला आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे ज्योत्ना ताम्रकार. ज्योत्स्नासोबत चालत्या ट्रेनमध्ये चोरी आणि मारहाणीची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १९ जून रोजी रात्री घडली. ज्योत्स्ना रीवा-बिलासपुर एक्सप्रेसमध्ये प्रवास करत होती. रात्री २ वाजता या एक्सप्रेसने कटनी स्टेशन सोडलं होतं. सिग्नल लागल्याने ट्रेन थांबली होती. त्याचवेळी अज्ञात माणूस तिच्या खिडकीपाशी आला आणि त्याने तिचा मोबाईल आणि पर्स चोरी करण्याचा प्रयत्न केला. ज्योत्स्नाने त्याचा सामना केला तेव्हा त्या चोराने तिच्या डोळ्यांखाली जोरदार मुक्का मारला आणि फरार झाला.

ज्योत्स्नाने ही सर्व घटना तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. याच दरम्यान तिच्या ट्रेनमधील S 1 आणि S 5 या कोचमधील प्रवाशांसोबतही चोरीची घटना घडली. यामुळे संपूर्ण ट्रेनमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. ज्योत्स्नाने १३९ या रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाईन नंबरवर फोन लावला. परंतु रेल्वे पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, असाही खुलासा तिने केला. 


ज्योत्स्नाने बिलासपुर स्टेशनला उतरल्यावर तासभर RPF आणि GRP यांची वाट बघितली. परंतु कोणी आलं नाही. ट्रेनमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एकही जवान तैनात नव्हता. "त्यामुळेच चोरांना लुटमार करण्याची संधी मिळाली. या घटनेत चोरांची एक टोळी असेल. जी सिग्रलला उभ्या असलेल्या रेल्वेला निशाणा बनवते. सरकार आणि रेल्वे प्रशासनाने या घटनेचं गांभीर्य ओळखून रेल्वेच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावलं उचलायला हवीत", अशी मागणी अभिनेत्रीने केली आहे. 

या घटनेबाबत जबलपूर रेल्वे विभागाचे जीआरपी स्टेशन प्रभारी एलपी कश्यप म्हणाले की, त्यांना सोशल मीडियाद्वारे या प्रकरणाची माहिती मिळाली आहे आणि आता पोलिस चौकशी करून कारवाई करतील. त्याच वेळी, बिलासपूर जीआरपी प्रभारी म्हणाले की, त्यांनी अभिनेत्रीशी फोन करून संपर्क साधला होता, परंतु ज्योत्स्नाने सांगितले की ती रायपूरला पोहोचली आहे आणि तिथे एफआयआर नोंदवणार आहे. ज्योत्स्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  ज्यामध्ये ती रडत आहे आणि तिच्या डोळ्याखालील जखम दाखवत असून रेल्वेच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित करत आहे.

Web Title: actress jyotsana tamrakar robbber punching his face and escape video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.