'लगोरी' खेळताना सूरजमुळे जान्हवीला दुखापत? मोठ्याने किंचाळली, सर्व हादरले! नवीन प्रोमो बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 17:46 IST2024-09-24T17:45:50+5:302024-09-24T17:46:23+5:30
बिग बॉस मराठीच्या घरात फिनालेला काहीच दिवस बाकी असताना जान्हवीला मोठी दुखापत झाली आहे (jahnavi killekar, bigg boss marathi 5)

'लगोरी' खेळताना सूरजमुळे जान्हवीला दुखापत? मोठ्याने किंचाळली, सर्व हादरले! नवीन प्रोमो बघाच
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक बाहेर पडून आता घरात ८ स्पर्धक उरले आहेत. कालच बिग बॉसने हा खेळ ७० दिवसांचा असल्याचं जाहीर केलं. मागील प्रत्येक सीझनप्रमाणे यंदाचा सीझन १०० नाही तर ७० दिवसांचा असणार आहे, याचा खुलासा झाला. अशातच आज बिग बॉस मराठीच्या घरात लगोरी हा खेळ खेळला जाणार असून हा टास्क खेळताना जान्हवीला मोठी दुखापत झाल्याचं दिसतंय.
जान्हवीला लगोरी खेळताना झाली मोठी दुखापत
बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत बिग बॉस आदेश देतात की, "आज खेळूया माझी लगोरी". या टास्कची घोषणा होताच सर्वजण जीव तोडून खेळतात. अशातच बाल्कनीत कल्ला करणाऱ्या सदस्यांवर DP चिडलेला दिसतो. "तोंड शिवा आणि गप्प बसा", असं DP मोठ्याने बोलताना दिसतो. पुढे सूरज आणि जान्हवीमध्ये झटापट होते. जान्हवीला खेळताना मोठी दुखापत होऊन ती किंचाळते. त्यामुळे संपूर्ण घराला धक्का बसतो. सगळे जान्हवीला सावरताना दिसतात.
हा सीजन फक्त ७० दिवसांचा
'बिग बॉस मराठी'चा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे हा खेळ जिंकण्याची सदस्यांमध्ये चांगलीच चढाओढ होत असलेली पाहायला मिळत आहे. सदस्यांनी आपला खेळदेखील बदलला आहे. अशातच काल बिग बॉसने हा सीजन १०० नाही तर ७० दिवसांचा असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे स्पर्धकांना चांगलाच धक्का बसला. यामुळे पुढील रविवारी म्हणजे ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठीची ग्रँड फिनाले होणार आहे.