हिट अँड रन प्रकरणात अडकली 'बिग बॉस' फेम अभिनेत्री; म्हणाली, 'दुचाकीस्वाराचीच चूक..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 15:29 IST2025-10-25T15:26:12+5:302025-10-25T15:29:40+5:30

आज अभिनेत्रीने युट्यूबवर शेअर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा स्क्रीनशॉट दाखवला. ती म्हणाली,

actress divya suresh reacts on hit and run incident denies her mistake | हिट अँड रन प्रकरणात अडकली 'बिग बॉस' फेम अभिनेत्री; म्हणाली, 'दुचाकीस्वाराचीच चूक..."

हिट अँड रन प्रकरणात अडकली 'बिग बॉस' फेम अभिनेत्री; म्हणाली, 'दुचाकीस्वाराचीच चूक..."

कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम दिव्या सुरेश हिच्यावर बंगळूरुमध्ये एका ज्येष्ठ महिलेला आपल्या गाडीने धडक देऊन गंभीर जखमी केल्याचा आरोप करण्यात आला. ४ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. दिव्याने घटनास्थळावरुन पळ काढल्याचंही सांगण्यात आलं. या हिट-अँड-रन प्रकरणाने खळबळ उडाली असून दिव्या सुरेशविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्यावर आता दिव्या सुरेशने स्पष्टीकरण दिलं आहे. 

दिव्या सुरेशने स्वत:चा बचाव केला आहे. आज दिव्याने युट्यूबवर शेअर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा स्क्रीनशॉट दाखवला. ती म्हणाली, "दुचाकीस्वाराची चूक होती..बाईकवर तीन लोक होते आणि कोणीच हेल्मेट घातलं नव्हतं.  कार ड्रायव्हर लेफ्ट टर्न घेत होता आणि तेव्हाच दुचाकीस्वार स्वत:च येऊन कारला धडकला. आता कार ड्रायव्हरला दोष देणं चुकीचं आहे. तुम्ही व्हिडीओ पाहा आणि आपले डोळे तपासा. एक अभिनेत्रीचा या घटनेत समावेश आहे म्हणून तुम्ही काहीही खोटे आरोप कराल का?"

ही घटना घडल्यानंतर जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना संपर्क साधला आणि दिव्या सुरेशच्या कारचा नंबर नोंदवला. पोलिसांनी कार नंबरच्या आधारे तपास केला असता, ती गाडी अभिनेत्री दिव्या सुरेशच्या नावावर असल्याचा  खुलासा झाला. पोलिसांनी कलम २७९ (निष्काळजीपणे वाहन चालवणे) आणि ३३८ (इतरांच्या जीवाला धोका निर्माण करून गंभीर दुखापत करणे) अंतर्गत दिव्या सुरेशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : हिट एंड रन मामले में फंसी 'बिग बॉस' फेम अभिनेत्री; बाइक सवार को ठहराया दोषी

Web Summary : कन्नड़ अभिनेत्री दिव्या सुरेश पर बेंगलुरु में एक महिला को टक्कर मारने का आरोप है। दिव्या ने सीसीटीवी फुटेज दिखाकर बाइक सवार को दोषी बताया, जिसमें तीन लोग बिना हेलमेट के दिख रहे हैं। पुलिस ने लापरवाही से गाड़ी चलाने का मामला दर्ज किया है।

Web Title : 'Bigg Boss' Fame Actress in Hit-and-Run; Blames Biker's Fault

Web Summary : Divya Suresh faces hit-and-run charges after allegedly injuring a woman in Bangalore. She claims the biker was at fault, citing a CCTV screenshot showing three people without helmets. Police have registered a case against her for negligent driving and causing grievous hurt.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.