नॅशनल टेलिव्हिजनवर लग्न करणार 'ही' अभिनेत्री, दिग्गज कलाकारांनी दिले आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:07 IST2025-09-22T16:07:29+5:302025-09-22T16:07:48+5:30
प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीचं लग्न अख्खा देश पाहणार

नॅशनल टेलिव्हिजनवर लग्न करणार 'ही' अभिनेत्री, दिग्गज कलाकारांनी दिले आशीर्वाद
'बालिका वधू'फेम अभिनेत्री अविका गौर लवकरच लग्न करणार आहे. मिलिंद चंदवानीसोबत तिने काही दिवसांपूर्वीच साखरपुडा केला. नंतर ते 'पती पत्नी और पंगा' या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाले. याच शोसाठी त्यांनी साखरपुडा केला होता. आता अविकाने नॅशनल टीव्हीवरच लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे. म्हणजेच छोट्या आनंदीचं लग्न फक्त तिचे कुटुंबीय नाही तर संपूर्ण देश बघू शकणार आहे.
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना अविका गौर म्हणाली, "कधी कधी मला सकाळी उठल्यावर हे स्वप्न नाही तर सत्य आहे याची स्वत:लाच आठवण करुन द्यावी लागते. मला मिलिंद सारखा जीवनसाथी मिळाल यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते. तो मला फक्त पाठिंबाच देत नाही तर पुढे जाण्यासाठी प्रोत्साहनही देतो."
मी २००८ पासून प्रेक्षकांसमोर येत आहे. सर्वांकडून मला खूप प्रेम मिळालं आहे. म्हणूनच माझ्या या आनंदाच्या क्षणी तुम्ही सगळे त्यात सहभागी असावे अशी माझी इच्छा आहे. लहानपणी मी म्हणायचे की एक तर माझं लग्न कोर्ट मॅरेज असेल ज्याची कोणालाच भनकही लागणार नाही किंवा मग असं लग्न असेल जे संपूर्ण देश पाहील. आता माझं ते स्वप्न साकार होणार आहे."
"माझ्या लग्नाचं कार्ड जेव्हा पहिल्यांदा सेटवर दाखवलं गेलं तेव्हा माझी आई भावुक झाली होती. अजून पत्रिका वाटप सुरु केलेलं नाही. कुटुंबाच्या सांगण्यावरुन आम्ही आधी सिद्धिविनायकासमोर पत्रिका ठेवणार आहे आणि आशीर्वाद घेणार आहे. आमच्या लग्नात भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, जन्नत जुबैर, अली गोनी हे शूटमुळे येऊ शकणार नाहीत पण त्यांनी मला शुभेच्छा पाठवल्या आहेत. तसंच अनुपम खेर, नागार्जुन आणि महेश भट्ट या दिग्गजांनी मला आशीर्वाद दिला आहे. हे माझ्यासाठी खूप खास आहे."