"बाई एकटी असेल तर आपला फायदा होईल म्हणून पुरुष...", अभिनेत्रीने मांडलं समाजातील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:11 IST2025-04-14T15:10:14+5:302025-04-14T15:11:55+5:30

मराठमोळी अभिनेत्री अतिशा नाईकने एका मुलाखतीत बाई जेव्हा एकटी असते तेव्हा तिला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, याचा खुलासा केला

actress atisha naik revealed the reality of society that single women faced problems | "बाई एकटी असेल तर आपला फायदा होईल म्हणून पुरुष...", अभिनेत्रीने मांडलं समाजातील वास्तव

"बाई एकटी असेल तर आपला फायदा होईल म्हणून पुरुष...", अभिनेत्रीने मांडलं समाजातील वास्तव

मराठमोळी अभिनेत्री अतिशा नाईक (atisha naik) या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. अतिशा नाईक यांनी मराठी नाटक, मालिका, सिनेमे अशा विविध माध्यमात काम केलंय. इतकंच नव्हे रणबीर कपूरसोबत त्या 'वेक अप सिड' सिनेमात काम केलंय. अतिशा नाईक यांनी एका मुलाखतीत एकट्या असलेल्या बाईला समाजातील माणसांचा कसा सामना करावा लागतो, याविषयी परखड मत व्यक्त केलंय.

अतिशा नाईक एकट्या बाईच्या समस्यांबद्दल काय म्हणाला?

अतिशा नाईक यांनी आरपार चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, "एखादा माणूस जग सोडून गेल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला लोकांची सिंपथी मिळते. लोक तुम्हाला कमी त्रास देतात. त्रास देत नाहीत असं नाही. बाई एकटी आहे का, विचारुन बघू. तिच्याही काही गरजा असतीलच. आपलाही फायदा होत असेल तर बघू, असा विचार केला जातो. मी सरसकट सगळ्या माणसांबद्दल बोलत नाहीये पण असे काही घटक समाजात असतात. पण तरी सिंपथी असते. तिच्या बाजूने आपण उभं राहायला पाहिजे, असं म्हणणारी लोकं असतात."

"जेव्हा लोक तुम्हाला सोडून जातात तर कोणामुळे तिचीच चूक असेल किंवा त्याचीच चूक असेल असं म्हटलं जातं. मी असं म्हणतच नाही की फक्त बाईलाच बोललं जातं. पुरुषाला पण बोललं जातं. कोणाच्या चुका आहेत हे लोकांनी बघूच नये. कारण घरात काय घडतं हे फक्त चार भिंतीत फक्त त्यांनाच माहित नसतं. त्यांच्या मुलांना पण याविषयी माहिती नसतं. त्यामुळे त्या भानगडीत कोणीच पडू नये. फक्त माझं एवढं म्हणणं आहे की, ती स्त्री एकटी राहत असेल किंवा तो पुरुष एकटा राहत असेल, तेव्हा त्यांना त्यांचं जगू द्या"

Web Title: actress atisha naik revealed the reality of society that single women faced problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.