'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'लक्ष्मी निवास' मालिकेत एन्ट्री, ५ वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:01 IST2025-03-04T13:00:09+5:302025-03-04T13:01:25+5:30

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री लक्ष्मी निवास मालिकेत महत्वपूर्ण भुमिका साकारताना दिसणार आहे (lakshmi niwas)

actress amruta deshmukh will be seen in lakshmi niwas marathi serial | 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'लक्ष्मी निवास' मालिकेत एन्ट्री, ५ वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'लक्ष्मी निवास' मालिकेत एन्ट्री, ५ वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक

झी मराठीवरील 'लक्ष्मी निवास' (lakshmi niwas) मालिका सर्वांच्या आवडीची. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचं मन जिंकलं. या मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलंय. हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी या कलाकारांची या मालिकेत प्रमुख भूमिका आहे. अशातच 'लक्ष्मी निवास' मालिकेत बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे ही अभिनेत्री ५ वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक करणार आहे.

या अभिनेत्रीची 'लक्ष्मी निवास' मालिकेत एन्ट्री

'लक्ष्मी निवास' मालिकेत अभिनेत्री अमृता देशमुखची (amruta deshmukh) एन्ट्री झाली आहे. अमृताचे सेटवरील फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये अमृता देशमुख मालिकेतील सहकलाकारांसोबत मजा-मस्ती करताना दिसतेय. अमृता देशमुख मालिकेत नेमकी कोणत्या भूमिकेत दिसणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. या मालिकेच्या निमित्ताने अमृता पाच वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक करत आहे. अमृताला शेवटी आपण सोनी मराठीवरील 'मी तुझीच रे' मालिकेत अभिनय करताना पाहिला.

अमृताचं वर्कफ्रंट

अमृता देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिला आपण 'फ्रेशर्स', 'मी तुझीच रे' या मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. 'तुमचं आमचं सेम असतं' या मालिकेतून अमृताने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. अमृताची प्रमुख भूमिका असलेला 'स्वीटी सातारकर' हा सिनेमाही लोकप्रिय झाला. अमृताने 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये अमृताची अभिनेता प्रसाद जवादेसोबत मैत्री झाली. त्यानंतर प्रसाद - अमृताने या दोघांनी रिअल लाईफमध्येही एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली.

Web Title: actress amruta deshmukh will be seen in lakshmi niwas marathi serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.