दोन मुलींचा बाबा आहे अभिनेता, १२ वर्ष लहान अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:59 IST2025-06-19T13:58:35+5:302025-06-19T13:59:18+5:30

टीव्ही, सिनेमांमध्ये तो दमदार भूमिकांमध्ये झळकला आहे.

actor shaheer shaikh rumoured dating with rhea sharma his co star despite being married and has two daughters | दोन मुलींचा बाबा आहे अभिनेता, १२ वर्ष लहान अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चांना उधाण

दोन मुलींचा बाबा आहे अभिनेता, १२ वर्ष लहान अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चांना उधाण

'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत अर्जुनच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता शाहीर शेख(Shaheer Shaikh). नुकताच तो क्रिती सेनच्या 'तीन पत्ती'मध्येही झळकला. शाहीर शेख वैयक्तिक आयुष्यात दोन मुलींचा बाबा आहे. शाहीर आणि पत्नी रुचिका कपूर अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. नंतर त्यांनी लग्न केलं. आता त्यांना दोन मुली आहेत. शाहीर शेखचे अनेक चाहते आहेत. टीव्ही, सिनेमांमध्ये तो दमदार भूमिकांमध्ये झळकला आहे. मात्र आता त्याच्याबद्दल वेगळ्याच  चर्चा सुरु झाल्या आहेत. १२ वर्ष लहान अभिनेत्रीला तो डेट करत असल्याची बातमी सध्या व्हायरल होत आहे.

अभिनेता शाहीर शेखचं नाव सध्या अभिनेत्री रेहा शर्मासोबत जोडलं जात आहे. दोघंही 'ये रिश्ते प्यार के' मालिकेत एकत्र दिसले होते. विवाहित आणि दोन मुलींचा बाप असून शाहीर एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा उठल्याने त्याच्यावर प्रचंड  टीका होत आहे. दोघांच्या  चाहत्यांनाही या चर्चांमुळे धक्का बसला आहे. या चर्चांवर शाहीर शेखने अद्याप उत्तर दिलेलं नाही. मात्र रेहा शर्माने नुकतंच यावर मौन सोडलं. ती स्पष्टीकरण देत म्हणाली, "मला वाटतं शाहीरचं आधीच लग्न झालं आहे. अशा परिस्थितीत आमचं नाव जोडणं हे योग्य नाही. या चर्चा निव्वळ अफवा आहेत."

शाहीर शेख आणि रेहा शर्माची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप गाजली होती. त्यांच्या जोडीचे अनेक चाहते होते. मालिकेत त्यांचे रोमँटिक सीन्सही होते. मात्र आता त्यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे चाहतेही काहीसे नाराज झाले. शाहीर शेख आणि पत्नी रुचिका कपूर यांना अनया आणि कुदरत या दोन गोंडस मुली आहेत. शाहीरने अद्याप या चर्चांवर भाष्य केलेलं नाही. मात्र या चर्चांमुळे त्याच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचं बोललं जात आहे.

Web Title: actor shaheer shaikh rumoured dating with rhea sharma his co star despite being married and has two daughters