चालत्या गाडीला लागली आग अन् अभिनेते केके गोस्वामी यांचा मुलगा थोडक्यात बचावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 14:09 IST2023-04-16T14:08:48+5:302023-04-16T14:09:26+5:30

त्याच्या कारला भरदिवसा आग लागल्याची घटना घडली आहे.

Actor KK Goswami 21 year old son navdeep driving car caught on fire | चालत्या गाडीला लागली आग अन् अभिनेते केके गोस्वामी यांचा मुलगा थोडक्यात बचावला

चालत्या गाडीला लागली आग अन् अभिनेते केके गोस्वामी यांचा मुलगा थोडक्यात बचावला

लहानपणीची सर्वांचीच आवडती टीव्ही मालिका 'शक्तिमान','गुटर गू' मध्ये दिसलेले अभिनेते केके गोस्वामी यांचा मुलगा अपघातातून थोडक्यात बचावला. त्याच्या कारला भरदिवसा आग लागल्याची घटना घडली आहे. सिटी सेंटर एसव्ही रोडवर ही दुर्घटना घडली. 

केके गोस्वामी (K K Goswami) यांचा मुलगा वडिलांच्या कारमधून फिल्मीस्तान स्टुडिओजवळ असलेल्या कॉलेजमध्ये जाण्यास निघाला होता. नवदीप जेव्हा कार चालवत होता तेव्हा अचानक चालत्या कारमध्ये आग लागली. सुदैवाने अग्निशमन दल वेळेवर पोहोचले. या दुर्घटनेत केके गोस्वामी यांचा मुलगा थोडक्यात बचावला. हे ऐकताच केके गोस्वामी चिंतीत झाले होते.

मुंबई पोलिसही घटनास्थळावर पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नवदीप 21 वर्षांचा असून सध्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर केके गोस्वामी यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती आणि भोजपुरी भाषांमध्ये काम केले आहे. 

Web Title: Actor KK Goswami 21 year old son navdeep driving car caught on fire