Kiran Mane News: अभिनेते किरण माने रुग्णालयात दाखल, पोस्ट करत म्हणाले, "आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 12:00 IST2024-07-31T11:07:14+5:302024-07-31T12:00:42+5:30
Kiran Mane News कालपर्यंत फीट, तंदुरुस्त होतो, आज सलाईन, इंजेक्शन्स....किरण मानेंची पोस्ट

Kiran Mane News: अभिनेते किरण माने रुग्णालयात दाखल, पोस्ट करत म्हणाले, "आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं..."
अभिनेते किरण माने (Kiran Mane) नेहमी सोशल मीडियावर आपली रोखठोक मतं मांडतात. गेल्या काही महिन्यांपासून तर ते फार चर्चेत होते. राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन अशा प्रत्येक विषयावर ते भाष्य करतात. त्यात त्यांच्या राजकीय पोस्ट तर खूप गाजतात. दरम्यान कालपर्यंत एकदम तंदुरुस्त असणारे अभिनेते आज रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांनी स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
काय आहे किरण मानेंची पोस्ट?
अभिनेते किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिले, "काल दुपारपर्यंत फिट, तंदुरुस्त, हसतखेळत होतो...आज हॉस्पिटल...सलाइन, इंजेक्शन्स आणि प्रचंड असह्य वेदना. आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं! अर्थात, यावरही मात करुन यातून बाहेर पडेन, फिकीर नॉट."
किरण माने यांना नक्की कशामुळे अॅडमिट व्हावं लागलं हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. मात्र त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना चाहते करत आहे. पोस्टच्या कमेंटमध्ये चाहत्यांनी त्यांना धीर दिला आहे. हॉस्पिटलमध्ये असूनही किरण माने पॉझिटिव्ह राहून याचा सामना करत आहेत. या प्रसंगातूनही बाहेर पडण्याची जिद्द त्यांनी दाखवली आहे.
किरण माने यांनी 'मुलगी झाली हो' मालिकेत काम केलं. या मालिकेतील सहकलाकारांसोबत त्यांचा वाद झाला होता. नंतर 'बिग बॉस मराठी 4' मुळे ते प्रसिद्धीझोतात आले. सध्या ते सन मराठीवरील 'तिकळी' मालिकेत भूमिका साकारत आहेत.