डॉक्टर अजितकुमारने रिक्रिएट केला सैराटमधील रंगपंचमीचा सीन; पाहा भन्नाट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 03:30 PM2022-03-18T15:30:19+5:302022-03-18T15:31:26+5:30

Kiran gaikwad: सैराट चित्रपटातील आर्ची आणि परश्याचा रंगपंचमीचा सीन रिक्रिएट केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर दिसून येत आहे. 

actor kiran gaikwad recreates Rangpanchami scene in Sarat | डॉक्टर अजितकुमारने रिक्रिएट केला सैराटमधील रंगपंचमीचा सीन; पाहा भन्नाट व्हिडीओ

डॉक्टर अजितकुमारने रिक्रिएट केला सैराटमधील रंगपंचमीचा सीन; पाहा भन्नाट व्हिडीओ

googlenewsNext

सध्या संपूर्ण देशभरात होळी, रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण रंगांची उधळण करत आहेत.  यामध्येच देवमाणूस फेम डॉक्टर अजितकुमार म्हणजेच अभिनेता किरण गायकवाडही रंगांमध्ये न्हाऊन निघाला. परंतु, त्याने एकदम फिल्मी स्टाइलमध्ये होळी खेळल्याचं दिसून येत आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात तो सैराट चित्रपटातील रंगपंचमीचा सीन रिक्रिएट करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेला किरण कायम त्याचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यावेळी त्याने रंगपंचमी खेळतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याने सैराट चित्रपटातील आर्ची आणि परश्याचा रंगपंचमीचा सीन रिक्रिएट केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर दिसून येत आहे. 

डॉक्टर अजितकुमारची रिअल लाइफ बहीणदेखील आहे अभिनेत्री; 'या' मालिकेत दोघांनी केलंय एकत्र काम

दरम्यान, किरण गायकवाडचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. सध्या वैष्णवी आणि किरण 'देवमाणूस 2' या मालिकेत एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत.
 

Web Title: actor kiran gaikwad recreates Rangpanchami scene in Sarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.