'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री; जानकी-ऋषिकेशच्या लव्ह स्टोरीतला खलनायक कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:08 IST2025-11-05T13:07:51+5:302025-11-05T13:08:49+5:30

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत आता प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे

actor kashyap parulekar entry in the serial Gharoghari Maticha Chuli serial played villain | 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री; जानकी-ऋषिकेशच्या लव्ह स्टोरीतला खलनायक कोण?

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री; जानकी-ऋषिकेशच्या लव्ह स्टोरीतला खलनायक कोण?

स्टार प्रवाहची 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेची गोष्ट १२ वर्ष मागे गेली असून ऋषिकेश जानकीच्या प्रेमाची गोष्ट आणि त्यांच्या प्रेमात अडथळे आणू पहाणारा मकरंद असा रंजक प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मकरंदचं जानकीवर एकतर्फी प्रेम आहे. मनोमनी जानकीला तो आपली पत्नी मानतो. सहसा तो कुणाला दुखावत नाही मात्र त्याला कुणी दुखावलंच तर तो कोणत्याही थराला जाऊ शकतो.

संकोची वृत्तीचा असलेला मकरंद जानकी-ऋषिकेशच्या नात्यातला सर्वात मोठा अडथळा असणार आहे. त्यामुळे घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा प्रत्येक भाग म्हणजे नवा खुलासा करणारा ठरणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता कश्यप परुळेकर मकरंद ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. 


या भूमिकेविषयी सांगताना कश्यप म्हणाला, ‘स्टार प्रवाहसोबत खूप जुनं नातं आहे. अगदी मन उधाण वाऱ्याचे मालिकेपासून सुरु झालेला हा प्रवास अविरत सुरुच आहे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेत मकरंद ही व्यक्तिरेखा मी साकारणार आहे. अतिशय हुशार आणि स्वकतृत्वावर विश्वास असणाऱ्या मकरंदचं जानकीवर एकतर्फी प्रेम आहे. जानकीचं प्रेम मिळवण्यासाठी तो काय काय करतो हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. मालिकेची संपूर्ण टीम खूपच छान आहे. सगळ्यांनीच मला या परिवारात सामील करुन घेतलं.''

 मराठी टेलिमव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच घरोघरी मातीच्या चुली मालिकेचं कथानक फ्लॅशबॅकमध्ये म्हणजेच बारा वर्षांनी मागे जाणार आहे. तेव्हा हा रंजक प्रवास अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. पाहायला विसरु नका घरोघरी मातीच्या चुली मालिका सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर बघायला मिळेल. या मालिकेत रेश्मा शिंदे, सुमीत पुसावळे, प्रतीक्षा मुणगेकर या कलाकरांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title : 'घरोघरी मातीच्या चुली' में नई एंट्री; कौन है विलेन?

Web Summary : स्टार प्रवाह के 'घरोघरी मातीच्या चुली' में नया मोड़, जानकी-ऋषिकेश की प्रेम कहानी फिर से। कश्यप परुळेकर मकरंद के रूप में प्रवेश करते हैं, जो जानकी के प्रति जुनूनी हैं, उनके रिश्ते में बाधाएं डालते हैं। शो रात 7.30 बजे प्रसारित होता है।

Web Title : New entry in 'Gharoghari Matichya Chuli'; Who's the villain?

Web Summary : Star Pravah's 'Gharoghari Matichya Chuli' takes a twist, revisiting Janaki-Rishikesh's love story. Kashyap Parulekar enters as Makrand, obsessed with Janaki, creating obstacles in their relationship. The show airs at 7.30 PM.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.