मराठी मालिकाविश्वातील आणखी एक अभिनेता चढला बोहल्यावर, लग्नाचा व्हिडीओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 10:17 IST2025-12-13T10:16:58+5:302025-12-13T10:17:34+5:30
सध्या मराठी कलाविश्वात लग्नसराई पाहायला मिळते आहे. मराठी मालिकेतील आणखी एका कलाकाराने लग्न केले आहे.

मराठी मालिकाविश्वातील आणखी एक अभिनेता चढला बोहल्यावर, लग्नाचा व्हिडीओ आला समोर
सध्या मराठी कलाविश्वात लग्नसराई पाहायला मिळते आहे. मराठी मालिकेतील कलाकार एकानंतर एक लग्नबेडीत अडकताना दिसत आहेत. बिग बॉस मराठी ५चा विजेता सूरज चव्हाण, सोहम बांदेकर-पूजा बिरारी, कोमल कुंभार, तेजस्विनी लोणारी, प्राजक्ता गायकवाड, निमिष कुलकर्णी या कलाकारांनंतर आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढला आहे. त्याच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा अभिनेता कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात ना. तर हा अभिनेता म्हणजे 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत झळकलेला अभिनेता भाग्येश पाटील.
अभिनेता भाग्येश पाटील नुकताच लग्नबेडीत अडकला आहे. त्याने प्रेरणा धुरीसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्याच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यावेळी त्याने पेशवाई हिरव्या रंगाचा फेटा, ऑफव्हाइट कुर्ता आणि हिरव्या रंगाची धोती परिधान केलीय. तर त्याच्या पत्नीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकरी त्याला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत.
वर्कफ्रंट
अभिनेता भाग्येश पाटील बऱ्याच वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात सक्रीय आहे. त्याने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. त्याला अग्गंबाई सासूबाई या मालिकेतून खरी ओळख मिळाली आहे. याशिवाय तो 'रंग झाला वेगळा', 'लग्नानंतर होईलच प्रेम', 'प्रेमास रंग यावे' मालिकेत झळकला आहे. तसेच या मालिकेत त्याने पत्रकाराची भूमिका साकारली होती. यासोबतच हम बने तुम बने, हे विठ्ठला यातही तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता.