Bigg Boss Marathi 6: धक्कादायक! करण सोनावणे आणि आयुष संजीव गेले घराबाहेर; प्राजक्ता शुक्रेला अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 21:34 IST2026-02-15T21:26:06+5:302026-02-15T21:34:08+5:30
'बिग बॉस मराठी ६' मध्ये आज धक्कादायक एविक्शन झालं. या आठवड्यात आयुष संजीव आणि करण सोनावणे घराबाहेर गेले आहेत. त्यामुळे सर्वांना धक्का बसलाय.

Bigg Boss Marathi 6: धक्कादायक! करण सोनावणे आणि आयुष संजीव गेले घराबाहेर; प्राजक्ता शुक्रेला अश्रू अनावर
'बिग बॉस मराठी ६' मध्ये आज धक्कादायक एविक्शन झालं. या आठवड्यात आयुष संजीव आणि करण सोनावणे घराबाहेर गेले आहेत. त्यामुळे सर्वांना धक्का बसलाय. भाऊचा धक्क्यावर काल रितेश देशमुखने या आठवड्यात डबल एविक्शन होणार, असा खुलासा केला होता. त्यामुळे नॉमिनेट असलेल्या सहा सदस्यांपैकी करण आणि आयुष यांचा 'बिग बॉस मराठी ६'मधील प्रवास संपला आहे.
या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी राकेश बापट, करण सोनावणे, सचिन कुमावत, प्रभू शेळके, आयुष संजीव आणि प्राजक्ता शुक्रे हे सहा जण नॉमिनेट होते. त्यापैकी आयुष आणि करणचा प्रवास संपला आहे. दोघेही गेल्या काही आठवड्यापासून खेळात कुठेतरी कमी पडत होते. त्याचाच परिणाम असा झालाय की, दोघांनाही कमी मतं पडल्याने घराबाहेर जावं लागलं आहे.
कोम आहेत करण - आयुष?
फोकस इंडियन या नावाने करण सोनावणे इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे. करणचं सोनावणे वहिनीच्या लूकमधील रिलही चांगलंच व्हायरल झालं आहे. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेला करण गेल्या काही वर्षात स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. करणचे अनेक रिल चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. करणने भारताचे क्रिकेट सामने आणि IPL मधील मुंबई इंडियन्स संघातील क्रिकेटपटूंसह रिल केले आहेत. करण घराबाहेर गेल्याने प्राजक्ताला अश्रू अनावर झाले आहेत.
तर दुसरीकडे आयुष संजीव हा प्रसिद्ध अभिनेता आहे. बॉस माझी लाडाची, ३६ गुणी जोडी या मालिकेतून आयुष झळकला आहे. आयुषने सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अलीकडे चांगलीच प्रसिद्धी मिळवली. आयुष बिग बॉस मराठी ६ मध्ये कॅप्टनही झाला होता. परंतु आजारपणामुळे आयुषला खेळता आलं नाही. गेले दोन आठवडे तो फार कमी दिसत होता. घरातील सदस्य आयुष आणि करणला नक्कीच मिस करतील, यात शंका नाही.