'तू आता आशुतोषचा विचार कर'; अनिरुद्धने दिला अरुंधतीला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 17:23 IST2022-05-15T17:22:00+5:302022-05-15T17:23:14+5:30

Aai kuthe kay karte: अरुंधतीच्या आयुष्यात आशुतोषची एन्ट्री झाल्यापासून अनिरुद्ध सतत त्याचा तिरस्कार करतो. परंतु, नकळतपणे अरुंधती, त्याच्या प्रेमात पडल्याची जाणीव अनिरुद्धला झाली आहे.

aai kuthe kay karte Now think of Ashutosh Aniruddha advised Arundhati | 'तू आता आशुतोषचा विचार कर'; अनिरुद्धने दिला अरुंधतीला सल्ला

'तू आता आशुतोषचा विचार कर'; अनिरुद्धने दिला अरुंधतीला सल्ला

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट आला आहे. आतापर्यंत प्रत्येक गोष्ट शांतपणे हाताळणारा आशुतोष सध्या जन्म-मृत्युच्या खेळात अडकला आहे. एका अपघातामुळे प्रचंड जखमी झालेला आशुतोष सध्या रुग्णालयात मृत्यूशी लढा देत आहे. त्यामुळे सध्या सगळेच चिंतेत आहेत. यामध्येच अरुंधतीचं नकळतपणे आशुतोषवर असलेलं प्रेम साऱ्यांना दिसून येतं. त्यामुळे पहिल्यांदाच अनिरुद्ध तिला आशुतोषसोबत लग्न कर असा सल्ला देतो.

अरुंधतीच्या आयुष्यात आशुतोषची एन्ट्री झाल्यापासून अनिरुद्ध सतत त्याचा तिरस्कार करतो. इतकंच नाही तर त्याने अनेक कार्यक्रमांमध्ये त्याचा अपमानही केला आहे. परंतु, नकळतपणे अरुंधती, त्याच्या प्रेमात पडल्याची जाणीव अनिरुद्धला झाली आहे. त्यामुळेच त्याने अरुंधतीला आशुतोषचा विचार कर असं सांगितलं आहे. याविषयी अभिनेता मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर करत अनिरुद्धची चांगली बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Summer vibes: वेणी अन् साडी सोडून अरुंधतीचा वेस्टर्न लूक; Strap Sleeveless ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

"प्रत्येक माणसामध्ये एक चांगली बाजू असते, अनिरुद्ध देशमुखमध्येही ती आहे. आणि, या सीनमध्ये नमिता आणि मुग्धाने, ती बाजु खूप चांगल्या पद्धतीने मांडली आहे . या सिनमधला एक डायलॉग मला खूपच आवडला, जो अरुंधतीशी, संजनाविषयी बोलताना अनिरुद्ध तिला सांगतो. “ मी असं म्हणणार नाही की माझं संजनावर प्रेम नाहीये किंवा नव्हतं. पण धबधब्याखाली फार वेळ नाही बसू शकत, शांत नदीत पाय सोडून कितीही वेळ बसू शकतो," असं कॅप्शन देत अनिरुद्धने ही पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आशुतोषवर उपचार सुरु असताना अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये त्याला भेटायला जातो. यावेळी अरुंधती नकळतपणे तिच्या प्रेमाची कबुली देते. हे पाहून अनिरुद्धला त्याची चूक उमगते आणि तो अरुंधतीला आशुतोषचा विचार कर असा सल्ला देतो. आशुतोषचं तुझ्यावर प्रेम आहेच. आणि, तुलाही ती भावना जाणवत असेल तर त्याचा हात धर असा सल्ला अनिरुद्ध अरुंधतीला देतो. त्यामुळे आता या मालिकेत पुढे काय होणार हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.

Web Title: aai kuthe kay karte Now think of Ashutosh Aniruddha advised Arundhati