Summer vibes: वेणी अन् साडी सोडून अरुंधतीचा वेस्टर्न लूक; Strap Sleeveless ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 10:33 AM2022-05-15T10:33:49+5:302022-05-15T10:36:18+5:30

Madhurani gokhale-prabhulkar:मधुराणी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ती तिचे ग्लॅमरस तर कधी साध्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले- प्रभुलकर.

'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून मधुराणी घराघरात पोहोचली आणि अवघ्या काही काळातच लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झाली.

या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारुन तिने खासकरुन स्त्री वर्गाचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळेच पडद्यावर आणि पडद्यामागे दोन्हीकडे मधुराणी चर्चिली गेली.

कलाविश्वाप्रमाणेच मधुराणी सोशल मीडियावरही सक्रीय असून अनेकदा ती तिच्या वैयक्तिक जीवनातील अपडेट्स चाहत्यांसह शेअर करत असते.

अलिकडेच मधुराणीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड कूल दिसत असून तिचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना आवडत आहे.

मधुराणीने हा खास समर लूक केला आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा वनपीस गाऊन परिधान केला आहे.

हे फोटो शेअर करत तिने समर व्हाइब्स असं कॅप्शन दिलं आहे. यावरुन तिने खास उन्हाळ्यासाठी हा लूक कॅरी केल्याचं दिसून येत आहे.

मधुराणी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ती तिचे ग्लॅमरस तर कधी साध्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक कवयित्रीदेखील आहे. अनेकदा ती तिच्या कवितावाचनाचे कार्यक्रम करत असते.

अलिकडेच मधुराणी एका कविता वाचनाच्या कार्यक्रमासाठी इंदूरला गेली होती. येथील काही फोटोसुद्धा तिचे व्हायरल झाले होते.