Video: अभिने घेतला विभक्त होण्याचा निर्णय; अनघासह लवकरच जाणार देशमुखांचा बंगला सोडून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 17:19 IST2022-04-27T17:19:07+5:302022-04-27T17:19:53+5:30
Aai kuthe kay karte: , एकीकडे घरातून बाहेर पडलेली अरुंधती अजूनही घर एकत्र जोडून ठेवायचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे संजना करत असलेल्या कटकारस्थानामुळे घरातील प्रत्येक सदस्य तिला कंटाळला आहे.

Video: अभिने घेतला विभक्त होण्याचा निर्णय; अनघासह लवकरच जाणार देशमुखांचा बंगला सोडून
'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत आतापर्यंत अनेक ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळालं. यात अनिरुद्ध आणि अरुंधती यांचा घटस्फोट झाल्यानंतर देशमुख कुटुंबाची संपूर्ण घडी विस्कटून गेली आहे. अरुंधती पाठोपाठ काही दिवसांपूर्वीच आप्पाही घर सोडून निघून गेले होते. मात्र, अरुंधतीच्या सांगण्यावरुन ते पुन्हा घरी परतले. मात्र, आता अभिने देशमुखांचा बंगला सोडून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. त्यानुसार, घरात होणाऱ्या सतत वादविवाद, कटकट या सगळ्यांना कंटाळून अभिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या निर्णयाचा अनघा विरोध करते. मात्र, तिचा विरोधही तो झुगारतो आणि आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं तिला खडसावून सांगतो.
दरम्यान, एकीकडे घरातून बाहेर पडलेली अरुंधती अजूनही घर एकत्र जोडून ठेवायचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे संजना करत असलेल्या कटकारस्थानामुळे घरातील प्रत्येक सदस्य तिला कंटाळला आहे. त्यामुळेच अभीने देशमुखांचा बंगला सोडून विभक्त होत वेगळा संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याच्या या निर्णयामुळे देशमुख कुटुंबावर काय परिणाम होतो अरुंधती त्याला समजावून शकेल का की अभी त्याच्या निर्णयावर ठाम राहणार हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.