Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ मालिकेत लगीनघाई, अरुंधती-आशुतोषने एकमेकांसाठी घेतला सुंदर उखणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 15:35 IST2023-02-22T15:35:21+5:302023-02-22T15:35:56+5:30
Aai Kuthe Kay Karte: होय, आशुतोष आणि अरूंधती अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नसोहळ्याच्या विधींना सुरूवात झाला आहे.

Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ मालिकेत लगीनघाई, अरुंधती-आशुतोषने एकमेकांसाठी घेतला सुंदर उखणा
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका. सध्या मालिका एका रोमॅन्टिक वळणावर आली आहे. होय, आशुतोष आणि अरूंधती अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नसोहळ्याच्या विधींना सुरूवात झाला आहे. दुसरीकडे लग्नात विध्न घालण्याचे अनिरुद्धचे कारनामे देखील पाहायला मिळत आहेत. सध्या या मालिकेचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात आशुतोषची नवरी बनण्यासाठी सज्ज असलेली अरुंधती सुंदर उखाणा घेताना दिसून येत आहे. आशुतोषही अरूंधतीसाठी उखाणा घेतोय. अरुंधती व आशुतोषचा उखाणा घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
काल परवा मालिकेतील मेहंदी सोहळ्याचा प्रोमो आता समोर आला होता. अनिरुद्ध घरात वाद घालून यशवर हात उचलतो, यावेळी अरुंधती त्याचा हात रोखते आणि तिच्या हातावरची मेहंदी पुसली जाते, असा हा प्रोमो तुम्ही बघितला असेलच. आता उखाण्याचा व्हिडीओही तुम्ही बघायलाच हवा.
'आयुष्याच्या मध्यानीला अनुभवले शांत चांदणे सुखाचे..ध्यानीमनी नसताना लाभले आशुतोष जोडीदार आयुष्याचे...,' असा सुंदर उखाणा अरूंधती आशुतोषसाठी घेते.
आशुतोषही अरूंधतीसाठी तितकाच सुंदर उखाणा घेतो. 'बसलो होतो माझा मी माझ्याच विचारांच्या गावी.. दूरच्या क्षितिजावर होती मनातली पहाट नवी.. अवचित एका रुक्ष क्षणी मोगऱ्याचा सुगंध दरवळला... अरुंधतीच्या येण्याने मला जगण्याचा अर्थ समजला', असा त्याचा उखाणा ऐकून अरूंधतीचा चेहरा खुलतो.
मालिकेत लवकरच अरुंधती आणि आशुतोष यांचा लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. दोघांच्या लग्नाला सर्वांचा पाठिंबा आहे. मात्र अनिरुद्ध आणि त्याची आई कांचन मात्र हे लग्न मोडण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. अशात अरूंधती व आशुतोषचं लग्नसोहळा कसा रंगतो, त्यात कोणकोणती विघ्न येतात, ते बघूच.