'केबीसी १७'मध्ये विचारण्यात आला विज्ञानासंबंधी २५ लाखांचा प्रश्न; स्पर्धकाने खेळच सोडला, तुम्हाला माहितीये उत्तर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:09 IST2025-12-10T17:08:13+5:302025-12-10T17:09:41+5:30
'केबीसी १७'मध्ये विज्ञानासंबंधी २५ लाखांचा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देता न आल्याने स्पर्धकाने खेळच सोडला

'केबीसी १७'मध्ये विचारण्यात आला विज्ञानासंबंधी २५ लाखांचा प्रश्न; स्पर्धकाने खेळच सोडला, तुम्हाला माहितीये उत्तर?
सध्या कौन बनेगा करोडपती अर्थात 'केबीसी १७'ची खूप चर्चा आहे. अमिताभ बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या खास शैलीत 'केबीसी १७'चं सूत्रसंचालन करत आहेत. 'केबीसी १७'मध्ये विविध स्पर्धक सहभागी होताना दिसतात. हे स्पर्धक त्यांच्या हुशारीने मोठी रक्कम जिंकतात. अशातच 'केबीसी १७'मध्ये एका स्पर्धकाला विज्ञानासंबंधीच्या प्रश्नाचं उत्तर देता न आल्याने खेळ सोडावा लागला. काय होता २५ लाखांचा हा प्रश्न?
'केबीसी १७'मधील २५ लाखांचा प्रश्न काय होता?
'केबीसी १७'मध्ये शेती विज्ञान विषयावरील सुवर्णपदक मिळवलेली शितल सहभागी झाली होती. शीतलने हुशारीच्या जोरावर जास्तीत जास्त रक्कम मिळवली. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी शितलला २५ लाखांचा प्रश्न विचारला. तो प्रश्न पुढीलप्रमाणे:- १६८७ साली शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटनने 'नॅचरल फिलोसॉफीचे गणितीय तत्वज्ञान' हे पुस्तक कोणत्या भाषेत प्रकाशित केलं?. या प्रश्नाचे पर्याय होते - A)ग्रीक B)फ्रेंच C)लॅटिन D)इंग्रजी. शीतलसाठी हा प्रश्न अवघड होता. त्यामुळे तिने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.
या प्रश्नाचं उत्तर होतं C) लॅटिन. परंतु उत्तर माहित नसल्याने शितलने गेम सोडला. आणि तिला १२.५० लाखांवर समाधान मानावं लागलं. 'केबीसी १७' सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल आहे. अमिताभ बच्चन वयाची ८० ओलांडली तरीही त्याच एनर्जीत 'केबीसी १७'चं सूत्रसंचालन करत आहेत. बिग बीं सर्व स्पर्धकांशी मनमोकळा संवाद साधून त्यांना खेळात प्रोत्साहन देताना दिसतात.