Bigg Boss 17: ऐनवेळी बिग बॉसमध्ये येण्यास एका स्पर्धकाची माघार? मेकर्सला झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 17:45 IST2023-10-14T17:44:15+5:302023-10-14T17:45:15+5:30
कोण कोण स्पर्धक सहभागी होणार याची चर्चा आधीपासूनच सुरु झाली होती. अनेकांची नावं आधीच समोरही आली आहेत.

Bigg Boss 17: ऐनवेळी बिग बॉसमध्ये येण्यास एका स्पर्धकाची माघार? मेकर्सला झटका
बिग बॉसचा 17 (Bigg Boss 17) वा सिझन सुरु होतोय. उद्या सिझनचा ग्रँड प्रिमियर पार पडणार आहे. चाहत्यांचं लक्ष उद्याच्या प्रिमियरकडे लागलं आहे. कोण कोण स्पर्धक सहभागी होणार याची चर्चा आधीपासूनच सुरु झाली होती. अनेकांची नावं आधीच समोरही आली आहेत. मात्र ऐनवेळेस एका स्पर्धकाने माघार घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे मेकर्सला झटका लागला आहे.
'द खबरी'च्या रिपोर्टनुसार अभिनेत्री मनस्वी ममगईने (Manasvi Mamgai) ऐनवेळी शोमध्ये येण्यास नकार दिलाय. काही वैद्यकीय कारणाने तिने हा निर्णय घेतल्याचं मेकर्सला कळवलं आहे. याबाबतीत अद्याप मनस्वी आणि मेकर्सकडून अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र तसं असेल तर मेकर्सला तिच्या जागी नवीन स्पर्धक शोधावा लागणार आहे. बॅकअपसाठी कोणता नवीन स्पर्धक सामील होतो हे बघणं महत्वाचं आहे.
मनस्वी ममगईने २०१९ साली मिस इंडिया वर्ल्डचा किताब जिंकला. तिने अजय देवगणच्या अॅक्शन जॅक्सन सिनेमात काम केलं आहे. तर नुकतंच तिने काजोलच्या 'द ट्रायल' वेबसिरीजमध्ये भूमिका साकारली.
'बिग बॉस 17' चा यावेळेसचा कन्सेप्ट फार वेगळा आहे. घरात ३ विभाग केले जाणार आहेत. दिल, दिमाग आणि दम असे ते भाग आहेत. दिल मध्ये कपल असणार आहे, दिमागमध्ये सिंगल लोक असतील. तर दममध्ये असे स्पर्धक ज्यांना स्पेशल पॉवर मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा सिझन काहीतरी खास घेऊन येणार हे नक्की.