२ वेळा मोडला संसार, २ वेळा लिव्ह इन रिलेशनशीप, वयाच्या 62 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचंय लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 10:57 IST2026-03-22T10:56:31+5:302026-03-22T10:57:04+5:30
Kunickaa sadanand: कुमार सानू आणि त्यांचं नातं कोणापासूनही लपलेलं नाही. परंतु, वयाच्या ६२ व्या वर्षी आजही त्या खऱ्या प्रेमाच्या शोधात आहेत

२ वेळा मोडला संसार, २ वेळा लिव्ह इन रिलेशनशीप, वयाच्या 62 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचंय लग्न
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत येणारा शो म्हणजे बिग बॉस (Bigg boss). आतापर्यंत या शोचे अनेक सिझन झाले असून त्यातील प्रत्येक स्पर्धक या ना त्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या बिग बॉस १९ मधील स्पर्धक आणि प्रसिद्ध अभिनेत्री कुनिका सदानंद या चर्चेत आल्या आहेत. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
कुनिका सदानंद (Kunickaa sadanand) कायम त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत असतात. कुमार सानू आणि त्यांचं नातं कोणापासूनही लपलेलं नाही. परंतु, वयाच्या ६२ व्या वर्षी आजही त्या खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे, असा खुलासा त्यांनी फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.
'बिग बॉस'मध्ये असतांनाही कुनिका यांनी त्यांच्या लव्हलाइफविषयी अनेक खुलासे केले. त्यानंतर आता त्यांनी मुलाखतीमध्येदेखील याविषयी भाष्य केलं. ''मी दोन वेळा लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. २ वेळा लग्न केलं आणि २ शॉर्ट टर्म रिलेशनशीपमध्ये सुद्धा होते. आपल्याकडे लग्न, अफेअर याविषयीचं स्वातंत्र फक्त पुरुषांना दिलं जातं. पण, स्त्रियांना सुद्धा हे सगळं करायचा हक्क आहे. मी आजही प्रेम करायला, लग्न करायला तयार आहे. फक्त मला ठोस कमिटमेंट देणारा व्यक्ती पाहिजे'', असं कनिका म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, ''जर मला मनासारखा जोडीदार मिळाला तर मी नक्कीच संसार थाटेन''. दरम्यान, कुनिका आणि कुमार सानू ही जोडी बरीच वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. मात्र, त्यानंतर त्यांच्यात दुरावा आला. लिव्ह इनमध्ये येण्यापूर्वी कुनिका यांचं २ वेळा लग्न झालं होतं. मात्र, त्यांची दोन्ही लग्ने टिकली नाहीत. या दोन्ही लग्नातून त्यांना अरिहंत कोठारी आणि अयान लाल ही दोन मुलेदेखील आहेत. सध्या सिंगल मदर म्हणून त्यांचा सांभाळ करत आहेत.