Prajakta Mali : आजही तो फोटो मी गॅलरीतून हटवला नाहीये...; प्राजक्ता माळीची खास पोस्ट, खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 16:55 IST2022-08-19T16:54:46+5:302022-08-19T16:55:56+5:30
Prajakta Mali : प्राजक्ता माळीवर चाहते अक्षरश: फिदा आहेत. तिने एखादी पोस्ट शेअर करायची देर की ती क्षणात व्हायरल होते. सध्या तिची अशीच एक पोस्ट तुफान व्हायरल होतेय.

Prajakta Mali : आजही तो फोटो मी गॅलरीतून हटवला नाहीये...; प्राजक्ता माळीची खास पोस्ट, खास फोटो
माझी प्राजू, माझा ऑक्सिजन म्हणून जिला चाहते डोक्यावर घेतात, ती म्हणजे मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali). प्राजक्ता माळीवर चाहते अक्षरश: फिदा आहेत. तिने एखादी पोस्ट शेअर करायची देर की ती क्षणात व्हायरल होते. सध्या तिची अशीच एक पोस्ट तुफान व्हायरल होतेय. ही पोस्ट एकदम खास आहे. कारण या पोस्टसोबत प्राजूने खास फोटो, खास आठवण शेअर केले आहेत.
होय,‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasya Jatra) या धम्माल कॉमेडी शोला आज 4 वर्ष पूर्ण झालीत. यानिमित्त प्राजक्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील विनोदवीरांची कॉमेडी प्रेक्षकांना जितकी आवडते, तितकंच प्राजूचं सूत्रसंचालन. विनोदवीरांच्या धम्माल पंचवर ‘व्वा दादा व्वा’ म्हणत तिने दिलेली दाद असो किंवा मग तिचं खळखळून हसणं असो सगळ्यांवर प्रेक्षक फिदा आहेत.
या कार्यक्रमामुळे प्राजक्ताला एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येता आलं. तिला नवी ओळख दिली. प्रेक्षकांनी तिला अक्षरश: डोक्यावर घेतलं. म्हणूनच हा कार्यक्रम, हा शो प्राजूसाठी खास आहे. यानिमित्ताने शोच्या पहिल्या दिवसाच्या शूटींगच्या आठवणी तिने शेअर केल्या आहेत.
चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सोनी मराठी ही वाहिनी सुरू झाली त्याच दिवशी महाराष्ट्राची हास्यजत्राही सुरू झालं. पहिल्या दिवशीच्या शूटींगच्या कॉस्च्युमचा फोटो आजही तिने जपून ठेवला आहे.
प्राजक्ताची पोस्ट
‘आज महाराष्ट्राची हास्यजत्रेला 4 वर्ष पूर्ण झाली. इतकं प्रेम आणि इतरांना हसवण्याचं भाग्य सगळ्यांना थोडीच लाभतं? सदैव कृतज्ञ. आजही मला माझ्या हास्यजत्रेच्या शुटींगचा पहिला दिवस लख्ख आठवतोय आणि आजही पहिल्या कॉस्ट्युमचा फोटो गॅलरीमधून हटवला नाहीये. सोनी मराठीलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. हास्यजत्रेच्या टीमबरोबर असं काम करत राहू..., अशी पोस्ट प्राजक्ताने शेअर केली आहे.
या पोस्टसोबत प्राजक्तानं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’च्या पहिल्या एपिसोडला घाललेल्या ड्रेसचा फोटो देखील शेअर केला आहे. तिची ही पोस्ट फोटो पाहून चाहत्यांची कौतुक केलंय.