'ससुराल सिमर का' मालिकेने केले 2000 एपिसोड पूर्ण, कलाकारांनी सेटवर असे केले सलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 11:55 IST2017-12-06T06:25:57+5:302017-12-06T11:55:57+5:30
छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे मालिकांची भाऊगर्दी झाली आहे.मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं,एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात आणि ठराविक ...

'ससुराल सिमर का' मालिकेने केले 2000 एपिसोड पूर्ण, कलाकारांनी सेटवर असे केले सलिब्रेशन
Also Read:'ससुराल सिमर का'मालिकेतील ही अभिनेत्रीची 'अग्नीफेरा' मालिकेत होणार एंट्री,बोल्ड फोटोशूटमुळे आली होती चर्चेत!
ससुराल सिमर का या मालिकेतून किर्तीचं तब्बल सात वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन होतंय. 'ससुराल सिमर' का मालिकेतील प्रमुख अभिनेत्री दीपिका कक्कड या मालिकेतून एक्झिट घेतली.दीपिकाची रिप्लेसमेंट म्हणून अभिनेत्री किर्ती गायकवाड केळकरने नवीन सिमर बनत सात वर्षांनंतर छोट्या पडद्यावर एंट्री केली.सात फेरे, छोटी बहू आणि डान्स रियालिटी शो नच बलियेमध्ये पाहिलंय. अनेक मालिकांमध्ये किर्तीने निगेटिव्ह शेड असलेल्या भूमिकाही साकारल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून किर्तीला छोट्या पडद्यावर कमबॅक करायचे होतं. मात्र किर्ती एका चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत होती. त्या दरम्यान सिमर भूमिकेसाठी तिला विचारण्यात आल्यावर तिने या मालिकेला क्षणाचाही विलंब न करता लगेच होकार दिला होता.