तारा सुतारिया पुन्हा प्रेमात! 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करेतय डेट? जाणून घ्या महाराष्ट्र कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:02 IST2025-05-28T13:02:24+5:302025-05-28T13:02:38+5:30
तारा सुतारिया लव्हलाईफमुळे चर्चेत, बॉलिवूड अभिनेतच्या प्रेमात पडली, जाणून घ्या 'त्याचं' महाराष्ट्र कनेक्शन

तारा सुतारिया पुन्हा प्रेमात! 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करेतय डेट? जाणून घ्या महाराष्ट्र कनेक्शन
आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे तारा सुतारिया. काही दिवसांपुर्वीच तिचा एक्स बॉयफ्रेंड आदर जैन हा लग्नबंधनात अडकला. करीना कपूरचा तो आतेभाऊ आहे. त्यानं आपल्या लग्नात दिलेल्या भाषणात पत्नी अलेखाशी लग्न करण्यापुर्वी ४ वर्ष आपण टाईमपास केल्याचं वक्तव्य केलं. यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. कारण, त्याचा रोख हा अभिनेत्री तारा सुतारियाकडे होता. तारासोबत तो ४ वर्ष रिलेशनशिपमध्ये होता. आता तारा आपल्या आयुष्यात पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय. ती पुन्हा एकदा प्रेमात पडली असल्याची चर्चा आहे.
तारा सुतारियाची लव्ह लाइफ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, तारा ही अभिनेता वीर पहारिया याला डेट करत आहे. तारा आणि वीरने काही महिन्यांपूर्वीच एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आहे. दोघंही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच तारा आणि वीर (Tara Sutaria And Veer Pahariya) एका फॅशन वीकमध्ये एकत्र दिसले होते. विशेष म्हणजे या शोमध्ये ते दोघंही शोस्टॉपर होते. त्यानंतर त्यांना एकत्र डिनर डेटवरही अनेक वेळा पाहिलं गेलं आहे. त्यामुळे ही चर्चाच अधिक वाढली आहे. मात्र, अद्याप या नात्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
वीर हा एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातून येतो. तो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. वीर हा स्मृती शिंदे यांचा मुलगा आहे.तो सध्या अभिनय क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतंच त्याने अक्षय कुमारसोबत 'स्काय फोर्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी वीरचं नाव सारा अली खान आणि मानुषी छिल्लरसोबत जोडलं गेलं होतं. तर ताराचं नाव याआधी अभिनेता अरुणोदय सिंहसोबतही जोडलं गेलं होतं. मात्र, एका मुलाखतीत तिनं स्वतःला सिंगल असल्याचं सांगितलं होतं आणि अरुणोदय हा तिचा केवळ चांगला मित्र असल्याचं स्पष्ट केलं होतं. तारा सुतारियाने फार कमी वेळात हिंदी चित्रपटसृष्टीत आपला खास ठसा उमटवला आहे.