सनी देओल रुपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज, या दिवशी रिलीज होणार 'बॉर्डर २'चा टीझर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 14:24 IST2025-12-05T14:23:50+5:302025-12-05T14:24:29+5:30
सनी देओल(Sunny Deol)च्या 'बॉर्डर २' (Border 2) चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आता निर्माते या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याची तयारी करत आहेत.

सनी देओल रुपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज, या दिवशी रिलीज होणार 'बॉर्डर २'चा टीझर
'बॉर्डर २' हा सनी देओलच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. 'बॉर्डर'ने पुन्हा एकदा लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली होती. आता 'बॉर्डर २'मधून सनी देओल पुन्हा एकदा लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असला तरी सनीने यावर्षीही चाहत्यांना एक भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
'बॉर्डर २' सिनेमात सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सर्वांचे चित्रपटातील लूकही समोर आले आहेत. आता चाहत्यांना टीझरची प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा आता काही दिवसांचीच राहिली आहे, कारण 'बॉर्डर २'चा टीझर लवकरच रिलीज होणार आहे. त्याची रिलीज तारीख समोर आली आहे.
'बॉर्डर २'चा टीझर कधी रिलीज होणार?
सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, वॉर ड्रामा 'बॉर्डर २'चा टीझर १६ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. १६ डिसेंबर रोजी भारतात विजय दिवस साजरा केला जातो. अशा परिस्थितीत 'बॉर्डर २' सिनेमाचा टीझर रिलीज करण्यासाठी ही एकदम योग्य वेळ आहे. या दिवशी 'बॉर्डर २'चा टीझर रिलीज करण्याचा निर्मात्यांचा निर्णय योग्य आहे. यामुळे लोकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढेल.
या दिवशी 'बॉर्डर २' होणार रिलीज
'बॉर्डर २' सिनेमाच्या रिलीजबाबत बोलायचं झाल्यास, हा चित्रपट २३ जानेवारीला रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटातील दिलजीत दोसांझचा लूक समोर आला आहे. दिलजीतच्या आधी सनी देओल आणि वरुण धवन यांचा लूकही समोर आला आहे.