"सुरुवातीला भयंकर टेन्शन अन् धाकधूक पण...", पुरस्कार मिळताच समद्धी केळकरची खास पोस्ट; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:46 IST2025-03-17T12:41:32+5:302025-03-17T12:46:27+5:30
'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून समृद्धी केळकर हे नाव घराघरात पोहोचलं.

"सुरुवातीला भयंकर टेन्शन अन् धाकधूक पण...", पुरस्कार मिळताच समद्धी केळकरची खास पोस्ट; म्हणाली...
Samruddhi Kelkar: 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून समृद्धी केळकर हे नाव घराघरात पोहोचलं. २०२० पासून सुरु झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं या मालिकेत किर्ती आणि शुभमच्या हटके लव्हस्टोरीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर समृद्धी मी होणार सुपरस्टार-जोडी नंबर 1’ झळकली. या शोचं सूत्रसंचालन तिने केलं. याचसाठी अभिनेत्रीला नुकत्याच पार पडलेल्या स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट निवेदक या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
समृद्धी केळकरला हा पुरस्कार मिळताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिलंय, "मालिका संपल्यावर लगेच एका डान्स शोचं निवेदन करण्याची संधी खूप कमी जणांना मिळते, “मी होणार सुपरस्टार “ साठी ती संधी मला स्टार प्रवाहमुळे मिळाली. नृत्य माझा जिव्हाळ्याचा विषय पण, निवेदन म्हणजे कधीच न केलेली गोष्ट. सुरुवातीला भयंकर टेन्शन आणि धाकधूक पण नॉवन फिक्शनच्या अख्या टीमने खूप सपोर्ट केला ,सांभाळून घेतलं आणि म्हणून मी माझं काम लीलया पार पाडू शकले. थॅक्यू सो मच टीम..."
चाहत्यांचे आभार मानत म्हणाली
ज्या रंगमंचावर स्पर्धक म्हणून सुरुवात केली होती त्याच रंगमंचावर निवेदन करून आज त्याचा पुरस्कार स्विकारतानाच्या भावना शब्दात व्यक्त करता येणार नाहीत …
आणि अर्थातच या डान्स शोचे दोन्ही पर्व हॉस्ट करू शकले ते मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे ,त्यांच्या प्रेमामुळे थॅक्यू सो मच असचं प्रेम कायम राहूद्यात. माझ्यावर विश्वास दाखवून एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवलीत त्याबद्दल खूप खूप आभार…! अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.
समृद्धीला सर्वोत्कृष्ट निवेदक हा पुरस्कार मिळताच मराठी कलाविश्वातील कलाकारांनी तिचं भरभरुन कौतुक केलं आहे. याशिवाय चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.