रश्मिका-विजयच्या रिसेप्शनमध्ये झाला मोठा गोंधळ, एक व्यक्ती गुपचुप आत घुसला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 15:54 IST2026-03-05T15:50:06+5:302026-03-05T15:54:20+5:30

दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानंतर आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड रिसेप्शनमध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे सर्वजण थक्क झाले.

unknown person enter in Rashmika-Vijay's reception bouncer thrown him away | रश्मिका-विजयच्या रिसेप्शनमध्ये झाला मोठा गोंधळ, एक व्यक्ती गुपचुप आत घुसला अन्...

रश्मिका-विजयच्या रिसेप्शनमध्ये झाला मोठा गोंधळ, एक व्यक्ती गुपचुप आत घुसला अन्...

दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानंतर आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड रिसेप्शनमध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे सर्वजण थक्क झाले. हैदराबादमध्ये पार पडलेल्या या शाही सोहळ्यात एका अज्ञात तरुणाने गोंधळ घातल्यामुळे बाऊन्सर्सना त्या तरुणाला बाहेर काढावं लागलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांमध्ये याचीच चर्चा रंगली आहे.

नेमकं काय घडलं?

रिसेप्शन सोहळा रंगात आलेला असताना एक तरुण सुरक्षा तोडून गुपचुप सेलिब्रिटींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला सुरक्षारक्षकांनी त्याला रोखले, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून बाऊन्सर्सनी त्या तरुणाची कॉलर पकडली आणि त्याला हॉलच्या बाहेर नेले. या झटापटीत रिसेप्शनमध्ये काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.


व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, बाऊन्सर्स त्या तरुणाला खेचत बाहेर नेत आहेत, त्यावेळी तो तरुण आरडाओरड करत विरोध करताना दिसत आहे. रश्मिका आणि विजय स्टेजवर असतानाच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. मात्र, या गोंधळामुळे सोहळ्यात कोणताही मोठा अडथळा आला नाही आणि काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली.

हा तरुण रश्मिका किंवा विजयचा फॅन असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. यापूर्वीही अनेक बॉलिवूड आणि साऊथ स्टार्सच्या कार्यक्रमात अशा घटना घडल्या आहेत. मात्र, रिसेप्शनसारख्या खासगी कार्यक्रमात असा राडा झाल्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रश्मिका-विजयच्या या रिसेप्शनला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक बडे कलाकार आणि राजकीय नेते उपस्थित होते. अल्लू अर्जुन, राम चरण आणि इतर सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title : रश्मिका-विजय के रिसेप्शन में हंगामा: घुसपैठिए ने मचाया बवाल, बाउंसरों ने किया हस्तक्षेप

Web Summary : हैदराबाद में रश्मिका मंदाना और विजय देवरकोंडा के रिसेप्शन में एक अज्ञात युवक ने सुरक्षा का उल्लंघन करते हुए हंगामा किया। बाउंसरों ने हस्तक्षेप कर उसे बाहर निकाला, जिससे कार्यक्रम में थोड़ी देर के लिए खलल पड़ा। आशंका है कि घुसपैठिया एक प्रशंसक हो सकता है। बाधा के बावजूद, कई हस्तियों की उपस्थिति में रिसेप्शन सुचारू रूप से जारी रहा।

Web Title : Chaos at Rashmika-Vijay Reception: Intruder Causes Scene, Prompting Bouncer Intervention

Web Summary : An unidentified young man disrupted Rashmika Mandanna and Vijay Deverakonda's reception in Hyderabad, breaching security. Bouncers intervened, leading him out and briefly disrupting the event. It is suspected the intruder may have been a fan. Despite the disruption, the reception continued smoothly with many celebrities in attendance.